Viral Video : सोशल मीडियावर रेसिपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही रेसिपी विचित्र असतात तर काही रेसिपी खूप हटके असतात. सध्या असाच एक रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोळीपासून अंड्याचा बर्गर कसा बनवायचा, त्याविषयी सांगितले आहे. व्हिडीओ पाहून तु्म्हीही थक्क व्हाल. आजवर तुम्ही बर्गरचे अनेक प्रकार पाहिले असेल पण हा प्रकार तुम्हालाही आवडेल. हा अंड्याचा बर्गर कसा बनवायचा, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल. (roti egg burger : try egg burger from chapati not bread)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक लहान वाटी घेतली आहे. त्यावर लाटलेली गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी ठेवली. त्यानंतर त्यावर एक अंडी फोडून त्यावर टाकले. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, हळद, तिखट, मसाले आणि मीठ टाकले. सर्व मिश्रण एकत्र केले. त्यानंतर त्यावर दुसरी लाटलेली पोळी टाकली. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की शेवटी पोळीला वाटीचा आकार दिला. त्यानंतर गॅसवर तेल गरम केले आणि गरम तेलातून ही पुरी सारखी दिसणारी पोळी वाटी उलट करून तळून घेतली. त्यातील अंड्याच्या स्टफमुळे जाडसर बर्गर तयार होतो आणि त्यानंतर व्हिडीओत तुम्हाला दिसेल बर्गरचे दोन समान भाग केले जाते. पोळीपासून बनवलेला अंड्याचा बर्गर तयार होतो. या व्हिडीओमध्ये एक एक स्टेप दाखवत बर्गर कसा बनवायचा, हे सांगितले आहे. तुम्हालाही व्हिडीओ पाहून ही रेसिपी ट्राय करावीशी वाटेल.

हेही वाचा : अस्सल खानदेशी लोणचं! १ किलोच्या अचूक प्रमाणात, २ वर्ष टिकणार अशी पारंपारिक पद्धत जाणून घ्या

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Marathwada Sushila Recipe : नाश्त्यात बनवा मराठवाड्याचा लोकप्रिय पदार्थ ‘सुशीला’, चुरमुऱ्यांपासून झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा

spicy_food_.lover या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल अ असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अंड्याची रेसिपी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अंड्याची कचोरी बनवली आणि बर्गर म्हणतोय” तर एका युजरने लिहिलेय, “मस्त बर्गर आहे.. उद्या नाश्त्याला बनवते” आणखी एका युजरने लिहिलेय, “याबरोबर शेजवान चटणी नक्की खाल” अनेक युजर्सना ही रेसिपी आवडली असून या व्हिडीओवरील गाणे आवडले आहेत.