scorecardresearch

Premium

सातारा स्पेशल झणझणीत शेंगदाण्याचा महाद्या! भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा झणझणीत भाजी

सातारची चमचमीत गावरान रेसिपी; शेंगदाण्याचा म्हाद्या नक्की ट्राय करा

satara special shengdanyacha mahadya recipe easy and instant recipe
सातारा स्पेशल शेंगदाण्याचा म्हाद्या (Photo: Cookpad)

महाराष्ट्र हा आपल्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. त्यात खाद्य संस्कृती महत्त्वाची भूमिका बजावते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात खाद्यसंस्कृतीमध्ये विभिन्नता दिसून येते आणि हिच खाद्यसंस्कृती त्या भागाची ओळख बनते. महाराष्ट्रातील सातारा हा त्याच्या झणझणीत अन् रांगड्या स्वभावासाठी ओळखला जातो. जिल्ह्यातील शेंगदाण्याचा म्हाद्या विशेष प्रसिद्ध आहे. इतर भागातील लोक याला शेंगदाण्याची आमटीही संबोधतात. आज आपण या सातारा स्पेशल शेंगदाण्याचा म्हाद्या या खास रेसिपीविषयी जाणून घेणार आहोत.

सातारा स्पेशल शेंगदाण्याचा म्हाद्या साहित्य –

Khekada rassa recipe in marathi Crab curry recipe
कोल्हापुरी स्टाईल झणझणीत खेकड्याच्या रस्सा; रविवारी करा खास बेत, नोट करा सोपी रेसिपी
Trick For Lemon Tree Add turmeric water to the root of a lemon tree, the plant will get lots of lemons throughout the year
Trick For Lemon Tree: लिंबाच्या रोपाच्या मुळाशी टाका ‘या’ गोष्टी, वर्षभर रोपाला येतील भरपूर लिंबू
health special jet spray use with care precautions
Health Special : जेट स्प्रे वापरताय…जरा सांभाळून!   
water dam in Koradi burst
नागपूर : कोराडीतील राख बंधाऱ्याच्या आतील पाण्याचा बंधारा फुटला.. आठ ट्रक पाण्यात बुडाले
  • १/२ कप शेंगदाणे
  • १ कप कांदा चिरलेला
  • १/२ टीस्पून जीरे
  • १ टीस्पून कांदा लसूण मसाला (लाल तिखट)
  • १/२ टीस्पून हळद
  • १/२ टीस्पून मीठ
  • २ टेबलस्पून तेल

सातारा स्पेशल शेंगदाण्याचा म्हाद्या कृती –

स्टेप १
शेंगदाणे थोडे भाजून घ्या व त्याचा जाडसर कुट करून घ्या. कांदा, कोथिंबीर चिरून घ्या.

स्टेप २
कढईत तेल तापत ठेवावे. तापले कि त्यात जीरे घाला, जीरे फुलले की कांदा घालून छान परतून घ्या. नंतर त्यात केलेला शेंगदाणे कुट घाला नी परत परतून घ्या. नंतर लाल तिखट, हळद, मीठ घाला परता शेवटी १ कप गरम पाणी घाला आणि भाजी शिजवून घ्या.

स्टेप ३
भाजी परतून थोडी खालीलप्रमाणे घट्ट करा. भाजी तयार आहे. आता वरुन कोथिंबीर घाला.

हेही वाचा >> झणझणीत तर्रीवाली खानदेशी अंडा करी; ट्राय करायलाच हवी अस्सल खान्देशी रेसिपी

स्टेप ४
मस्त झणझणीत लज्जतदार महाद्या तयार आहे. भाकरी, चपाती बरोबर मस्त लागते ही रेसिपी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satara special shengdanyacha mahadya recipe easy and instant recipe srk

First published on: 04-12-2023 at 14:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×