लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पुलाव आवडतो. सहसा आपण घरी मटर पुलाव करतो पण नेहमी मटर पुलाव खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही घरी हॉटेलसारखा शाही पुलाव बनवू शकता. शाही पुलाव जितका आरोग्यासाठी पौष्टिक असतो तितकाच चवीला टेस्टी सुद्धा असतो. जर तुम्हाला शाही पुलाव बनवायचा असेल तर ही सोपी रेसिपी नोट करा.
साहित्य:
- बासमती तांदुळ
- पनीर
- बटाटा
- कांदा
- फ्लॉवर
- मटार
- काजू
- गाजर
- मिरे
- दालचिनी
- तमालपत्र
- मीठ
- तेल
- पाणी
हेही वाचा : ३० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजुराचे लाडू, सोपी रेसिपी लगेच नोट करा

Jugaad Video : काय सांगता! टूथपेस्टनी नेल पॉलिश काढता येते; हा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Garlic Chutney : झणझणीत अन् चटकदार लसणाची चटणी कशी बनवावी? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

Health Special: खऱ्याखुऱ्या तब्येतीसाठी डिजिटल वेलबीइंगचा उतारा

१ वाटी बेसन, दह्यासह ‘हा’ पदार्थ वापरून तांब्याची भांडी करा लख्ख; दिवा, ताम्हण घासायचे कष्टच नाही, Video पाहा
कृती
- तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवा
- सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्या
- पनीर आधीच तळून घ्या
- एका कढईत तेल गरम करा आणि कांदा परतून घ्या
- त्यात तेज पान आणि इतर सर्व मसाले चांगले परतून घ्या
- त्यात सर्व भाज्या टाका आणि चवीनुसार मीठ टाका
- त्यात मिरे पावडर टाका
- नंतर पाणी टाका आणि नंतर तांदूळ टाका
- तांदूळ शिजले की तुमचा शाही पुलाव तयार होणार.
- सर्व्ह करण्यापूर्वी त्यात तळलेले काजू आणि कोथिंबिर टाका.