Shev Tomato Bhaji Recipe : सोशल मीडियावर रेसिपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक नवनवीन आणि चमचमीत रेसिपी दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शेव टोमेटोची भाजी कशी बनवायची, याविषयी सांगितले आहेत.
तुम्ही आजवर टोमॅटोची भाजी किंवा चटणी खाल्ली असेल पण तुम्ही कधी शेव टोमॅटोची भाजी खाल्ली आहेत का? होय, शेव टोमॅटोची भाजी. चवीला अप्रतिम वाटणारी शेव टोमॅटोची भाजी बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे.

दररोज भाजी कोणती करावी? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो किंवा अनेकदा घरात भाजीचे नसते अशा वेळी तुम्ही ही शेव टोमॅटोची भाजी बनवू शकता. लहान मुलांपासून वृद्ध लोकांना सर्वांना ही भाजी आवडेल. लहान मुलांना सकाळी टिफीनवर तुम्ही ही भाजी देऊ शकता. अगदी झटपट होणारी ही भाजी तुम्ही एकदा खाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून खावीशी वाटेल,

Pune Ganeshotsav 2024
Pune Video : पुण्यात गणपती बघायला जाताय? मग हा व्हायरल व्हिडीओ पाहाच
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
prank with sandwich seller | Funny Viral Video
“हे सँडविच कोणी बनवले?” तरुणाने जोराने ओरडत विचारले, विक्रेता घाबरत पुढे आला अन्… पाहा व्हायरल VIDEO
St driver wrote on bus bonnet | St bus Viral Video | MSRTC bus
एसटी बसचालकाने बोनेटवर लिहिले असे काही की… तुम्ही चुकूनही त्यावर पाय ठेवणार नाही, Video एकदा पाहाच
Nagpur Video | ganeshotsav 2024
Nagpur Video : याला म्हणतात नाद! ढोल ताशा नव्हे तर खोक्यावर धरला ठेका; निरागस चिमुकल्याचा जोश पाहून व्हाल अवाक्
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Jugaad Video | how to clean charger cable with the help of toothpaste
टूथपेस्टच्या मदतीने फक्त एक मिनिटामध्ये चार्जर केबल करा स्वच्छ, पाहा अनोखा जुगाड, VIDEO VIRAL
jalna Driver decorated Lalpari bus | decorative st bus video viral
चालकाने स्वखर्चातून सजवली लालपरी! सजवलेल्या सुंदर एसटी बसचा VIDEO VIRAL

शेव टोमॅटोची भाजी कशी बनवायची?

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

साहित्य

  • जिरे
  • आलं लसणाची पेस्ट
  • बारीक चिरलेल्या
  • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • बारीक चिरलेला कांदा
  • टोमॅटो प्युरी
  • तेल
  • हळद
  • मीठ
  • लाल तिखट
  • कांदा लसूण मसाला
  • शेव

हेही वाचा : Manchurian Pancake Recipe: भाज्यांपासून बनवा हेल्दी ‘मंच्युरियन पॅनकेक’ ; नाश्त्यासह मुलांच्या डब्यासाठी ठरेल बेस्ट ; रेसिपी लिहून घ्या लगेच

कृती

  • सुरुवातीला एक कढई घ्या.
  • त्यात तेल गरम करा.
  • गरम तेलात जिरे टाका.
  • त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाका.
  • त्यानंतर बारीक चिरलेले कांदा आणि हिरवे मिरीचे टाका.
  • नीट परतून घ्या.
  • त्यानंतर कांदा लसूण मसाला, हळद आणि लाल तिखट टाका.
  • त्यानंतर त्यात टोमॅटोची प्युरी टाका.
  • चवीपुरते मीठ टाका.
  • थोडे पाणी टाका आणि भाजी शिजू द्या
  • त्यानंतर बारीक शेव टाका आणि त्यात नीट एकत्रित करा आणि लगेच गॅस बंद करा.
  • चमचमीत शेव टोमॅटोची भाजी तयार होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Raw Banana Chivda: मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी बनवा ‘कच्चा केळींचा चिवडा’ ; चटपटीत अन् पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा? साहित्य, कृती लिहून घ्या

swast_ani_mast_recipes या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “घरात भाजीला काही नसेल तेव्हा बनवा ही झटपट शेव टोमेटो ची भाजी” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून तोंडाला पाणी सुटले” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक नंबर रेसिपी आहे. मी नक्की ट्राय करेन” अनेक युजर्सना ही रेसिपी आवडली आहे.