shevayacha upma recipe : रोजच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न अनेकदा पडतो. नाश्ता हेल्दी असावा आणि चविष्टही, अशी सर्वांचीच इच्छा असते. अशावेळी पौष्टिक आणि झटपट तयार होणारा शेवयांचा उपमा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अनेकांना रव्याचा उपमा आवडत नाही. पण, शेवयांचा उपमा बनवायला अगदी सोपा असून त्याची चवही अप्रतिम लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा नाश्ता कमी वेळात तयार होतो. झणझणीत, खमंग अशी महाराष्ट्रीयन रेसिपी कशी बनवायची चला जाणून घेऊयात…
साहित्य
- शेवया
- कांदा
- हिरवी मिरची
- शेंगदाणे
- कढीपत्ता
- मोहरी
- जिरे
- हळद
- तेल/तूप
- कोथिंबीर
व्हिडीओ नक्की बघा…
कृती
- तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाका.
- शेंगदाणे, कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.
- मसाले घाला आणि शेवया नीट परतून घ्या.
- पाणी घालून शेवया मऊ होईपर्यंत शिजवा.
- वरून ताजी कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
- नाश्त्यासाठी अगदी साधा पण चवीला मात्र एकदम जबरदस्त शेवयांचा उपमा तयार…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @dipvika_ki_rasoi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
