Shravan recipe 2024: सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावणात अनेक व्यक्ती उपवास करतात. या काळात महादेवाची मनोभावे सेवा केली जाते. त्यासाठी कुटुंबातील सर्व व्यक्ती उपवास करतात. उपवासाला फळे आणि साबुदाण्याचे विविध पदार्थ खाल्ले जातात.याच उपवासाला आता साबुदाणा रबडी करुन पाहा. चला याची रेसिपी पाहुयात. साबुदाणा रबडी बनवण्यासाठी साहित्य साबुदाणा - १ वाटीदूध - १/२ लिटरसाखर - १ टेस्पूनकेळी - १सफरचंद - १क्रीम - १ कपचेरी - पर्यायीडाळिंब - एक टेबलस्पूनकेशर पानेगुलाबाच्या पाकळ्याबदामाचे तुकडे साबुदाणा रबडी कशी बनवायची? उपवास स्पेशल साबुदाणा रबडी बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा पाण्यात भिजवावा. यानंतर एका पातेल्यात दूध टाकून मध्यम आचेवर उकळा. आता साबुदाणा गाळून दुधात घाला आणि मंद आचेवर अधूनमधून ढवळत तो घट्ट होईपर्यंत शिजवा. यानंतर त्यात साखर घालून चांगले मिसळा आणि गॅस बंद करा. यानंतर क्रीम, केळी आणि चिरलेले सफरचंद घालून मिक्स करा. आता हे तयार मिश्रण काही वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि थंड करा. हेही वाचा >> श्रावणी शुक्रवारसाठी करा दलिया; नैवेद्यासाठी खास आणि करायलाही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा आता स्वादिष्ट साबुदाणा रबडी तयार आहे. एका भांड्यात काढून चेरी, डाळिंब, गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा आणि सर्व्ह करा.