Premium

पौष्टिक अडई डोसा खाल्ला का? ही सोपी रेसिपी लगेच नोट करा अन् घरीच झटपट बनवा

अडई डोसा अत्यंत पौष्टिक आणि चवीला तितकाच टेस्टी असतो. आज आपण अडई डोसा घरच्या घरी कसा बनवायचा, हे जाणून घेणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा.

South Indian Adai Dosa recipe
पौष्टिक अडई डोसा (Photo : YouTube)

Adai Dosa : डोसा हा जरी साउथ इंडियन पदार्थ असला तरी भारताच्या सर्वच राज्यात आवडीने खाल्ला जातो. सहसा आपण तांदळापासून डोसा घरी बनवतो पण तुम्ही कधी तांदूळ आणि मिक्स डाळीपासून बनवलेला डोसा खाल्ला आहे का? यालाच अडई डोसा सुद्धा म्हणतात. अडई डोसा अत्यंत पौष्टिक आणि चवीला तितकाच टेस्टी असतो. आज आपण अडई डोसा घरच्या घरी कसा बनवायचा, हे जाणून घेणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

तांदूळ
तूर डाळ
चणा डाळ
मुग डाळ
उडीद दाळ
लाल मिरच्या
मेथी दाणे
आले
तेल

हेही वाचा : असा बनवा हॉटेलसारखा खमंग शाही पुलाव, लगेच ही सोपी रेसिपी जाणून घ्या

कृती :

तांदूळ, सर्व डाळी, मेथी दाणे आणि लाल मिरच्या ५-६ तास पाण्यात भिजत ठेवावेत.
त्यातील पाणी काढून त्यात आलं आणि मीठ टाकावे
आणि मिक्सरमध्ये बारीक करावे.
डोसाच्या पिठा इतकं मिश्रण दाट करावं.
एक नॉनस्टीक तवा गरम करावा करावा आणि गरम तव्यावर डोसा टाकावा.
कडेने तेल सोडावे.
डोसा चांगला भाजावा.
हा गरम डोसा तुम्ही सांबर आणि बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: South indian adai dosa recipe how to make adai dosa a high protein healthy breakfast food ndj

First published on: 23-09-2023 at 16:51 IST
Next Story
तिखट जिलेबी! एकदा खाल तर गोड जिलेबी विसरुन जाल…ही घ्या सोपी रेसिपी