Sago Barfi Recipe: सध्या नवरात्री सुरू असून या दिवसांमध्ये उपवासाच्या विविध रेसिपी महिला ट्राय करत असतात. तसेच लहान मुलांनाही नवनवीन खाद्यपदार्थ खाण्याची आवड असते. तुम्ही आतापर्यंत साबुदाण्याचा वडा, खीर खाल्ली असेल; पण आज आम्ही तुम्हाला साबुदाण्याची बर्फी कशी बनवायचा हे सांगणार आहोत. ही रेसिपी बनवायला एकदमी सोपी आहे.

साबुदाण्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ वाटी साबुदाणा
  • २ वाटी साखर
  • १ चमचा वेलची पावडर
  • १/२ वाटी ड्राय फ्रुट्स
  • १ लिटर दूध
  • १ वाटी तूप

साबुदाण्याची बर्फी बनवण्याची कृती:

हेही वाचा: साबुदाणा न भिजवता फक्त काही मिनिटांत झटपट बनवा साबुदाण्याची खिचडी; एकदम सोपी रेसिपी

Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Vidarbha special tondlichi masala bhaji recipe in marathi eating pointed gourd is good for health
विदर्भ स्पेशल तोंडलीची भाजी; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “तोंडली मसाला” भाजी
  • साबुदाणे पाण्यात भिजवून घ्या. त्यानंतर साबुदाण्यातील पाणी काढून ते कोरडे करून घ्या.
  • आता साबुदाणा एका कढईत भाजून तो कोरडा झाल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवा.
  • साबुदाणा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून साबुदाण्याची पावडर तयार करा.
  • आता एका कढईमध्ये साबुदाण्याचे तयार केलेली पावडर भाजून घ्या यावेळी वरून तूपही घाला.
  • दुसरीकडे दूधात साखर, वेलची पूड घालून दूध पूर्णपणे आटवून घ्या.
  • आता आटवलेले दूध साबुदाण्याच्या पिठात मिक्स करून घ्या.
  • आता ज्यात बर्फी बनवणार आहात त्या ताटात बर्फीचे मिश्रण ओता त्यावर ड्रायफ्रुट्स घाला आणि बर्फी थंड झाल्यावर तिचे काप करा.
  • तयार साबुदाण्याच्या बर्फीचा आस्वाद घ्या.