Garlic Chutney : चटणीमुळे जेवणाचा स्वाद वाढतो. आपण सहसा शेंगदाण्याची चटणी, टोमॅटोची चटणी, चिंचेची चटणी, नारळाची चटणी, डाळीची चटणी घरी बनवतो पण तुम्ही कधी लसणाची चटणी घरी बनवली आहे का? लसणाची चटणी ही अत्यंत पौष्टिक आणि चवीला स्वादिष्ट असते. लसणाची चटणी सहसा वडापाव, डोसा किंवा पराठाबरोबर खातात. जर तुम्हाला घरच्या घरी लसणाची चटणी बनवायची असेल तर ही सोपी रेसिपी नोट करा.
साहित्य :
- लसूण
- मीठ
- शेंगदाणे
- आमचूर पावडर
- लाल तिखट
- तेल
हेही वाचा : पौष्टिक अडई डोसा खाल्ला का? ही सोपी रेसिपी लगेच नोट करा अन् घरीच झटपट बनवा

फणसाची भाजी; बोटं चाटून पुसून खाल जेव्हा ‘या’ पद्धतीने फणसाची भाजी बनवून बघाल

कढीपत्त्याशिवाय तुमचा स्वयंपाक पूर्ण होत नाही; मग घरातच करा कढीपत्त्याची लागवड, जाणून घ्या सोप्या टिप्स

Jugaad Tricks : बॅगवरील काळे डाग झटक्यात होतील गायब, फक्त हे सोपे घरगुती उपाय करा

१ वाटी बेसन, दह्यासह ‘हा’ पदार्थ वापरून तांब्याची भांडी करा लख्ख; दिवा, ताम्हण घासायचे कष्टच नाही, Video पाहा
कृती:
- लसणाच्या पाकळ्या सोलून घ्याव्यात
- त्यात थोडे लाल तिखट घालून हे लसूण मिक्सरमधून बारीक करावे
- फोडणीसाठी लहान कढई घ्यावी आणि त्यात तेल गरम करावे. तेलात बारीक केलेले लसूण चांगले परतून घ्यावे.
- त्यात पुन्हा लाल तिखट टाकावे
- याच मिश्रणात शेंगदाण्याचा कूट, आमचूर पावडर आणि मीठ घालावे.
- ही लसणाची चटणी तुम्ही वडापाव, डोसा किंवा पराठाबरोबर खाऊ शकता.