Tandalachi kheer Recipe : सध्या पितृपक्ष सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये पितरांचे स्मरण केले जाते. या काळात आपल्या पूर्वजांची पुजा केली जाते. श्राद्धाच्या दिवशी घरी जेवण बनविले जाते. पितृपक्षाच्या थाळीमध्ये तांदळाच्या खीरेला विशेष महत्व आहे. जर तुम्ही पितृपक्षात तांदळाची खीर करत असाल तर सोप्या पद्धतीने तुम्ही स्वादिष्ट खीर बनवू शकता. त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.
साहित्य
- तांदूळ
- दूध
- साखर
- ड्राय फ्रुटस
- ओले नारळ
- तूप
- वेलची पावडर
हेही वाचा : Paneer Paratha : हेल्दी ब्रेकफास्ट करायचाय? मग बनवा पौष्टिक पनीर पराठा; सोपी रेसिपी लगेच नोट करा

पितृपक्षात अळू वडी करताय? अशी बनवा कुरकुरीत अळू वडी, जाणून घ्या ही सोपी पद्धत

पितृपक्षाच्या नैवद्यासाठी अशी करा कुरकुरीत घोसाळ्याची भजी, ही सोपी रेसिपी लगेच जाणून घ्या

पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी कढी करताय? अशी बनवा चटपटीत कढी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

Pitru Paksha 2023 : पितृपक्ष अन् कावळा कावळीचा जीव टांगणीला! व्हायरल काल्पनिक संवादाची धूम
कृती
- तांदूळ स्वच्छ धुवा आणि15 मिनिटे पाण्यात भिजवा
- १५ मिनिटानंतर तांदूळ पाण्यातून बाहेर काढा
- आणि मिक्सरमध्ये जाड रव्यासारखे बारीक करा.
- एका भांड्यात दूध गरम करा.
- दुधाला उकळी आली की त्यात बारीक केलेले तांदूळ टाका
- १५ मिनिटे शिजवून घ्या
- तांदूळ शिजले की दूध ही घट्ट होईल. आता त्यात प्रमाणानुसार साखर घाला.
- त्यात ओल्या खोबऱ्याचा किस, वेलची पावडर व ड्राय फ्रुटस टाका आणि थोडा वेळ खीर शिजवून घ्या
- तुम्हाला आवडत असेल तर त्यात साजूक तूप घाला