डॉ. सारिका सातव साहित्य * शेंगदाणा कूट- एक वाटी * तिळकूट- एक वाटी * गूळ- एक ते दीड वाटी * वेलची पूड- अर्धा चमचा * गहू पीठ * तूप आणखी वाचा - तिळगूळ घ्या.. गोड बोला! कृती * शेंगदाणे, तीळ भाजून त्याचा जाडसर कूट करून घ्यावा. * गूळ किसून त्या मिश्रणात गोडाच्या आवडीनुसार मिसळावा. * सर्वात शेवटी वेलची पूड मिसळून मिश्रण एकसारखे करावे. * गव्हाचे पीठ मळून घ्यावे. * पुराच्या पोळीप्रमाणे तयार केलेले मिश्रण भरून पोळी लाटावी. * तूप लावून भाजावी. आणखी वाचा - मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? यामागचे ‘हे’ कारण जाणून तुम्हीही पतंग उडवाल वैशिष्टय़े * चांगल्या प्रकारची मेदाम्ले तिळामधून मिळतात. * संधिवात, केसांच्या तक्रारी, कृशता, सूज इत्यादी अनेक व्याधींमध्ये उपयुक्त. * लहान मुलांसाठी, गर्भिणी, सर्व वयोगटातील स्त्रिया, खेळाडू इत्यादी अनेक वर्गासाठी उपयुक्त * थंडीमध्ये खाण्यासाठी उत्तम पदार्थ.