Onion Chutney: भाकरी किंवा पोळीसह लसणाची चटणी, मिरचीची चटणी आपण नेहमीच खातो. पण,आज आम्ही तुम्हाला कांदाच्या झणझणीत चटणी कशी बनवायची हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कांद्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती कांद्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: (Onion Chutney) ५ मोठे कांदे ५-६ हिरव्या मिरच्या २-३ लाल सुक्या मिरच्या २ चमचे तेल १/२ चमचे मोहरी मीठ (चवीनुसार) कांद्याची चटणी बनवण्याची कृती: हेही वाचा: गोड खाण्याची इच्छा होतेय? मग घरीच बनवा गव्हाची पौष्टिक नानकटाई; पटकन लिहून घ्या साहित्य अन् कृती सर्वात आधी कांदा सोलून स्वच्छ धुवून घ्या. बारीक चिरून घ्या आणि वरील सर्व साहित्य एका भांड्यात बाजूला ठेवा. आता एका भांड्यात कोथींबीर, हिरवी मिरची, मीठ आणि लाल सुकी मिरची टाकून त्याची जाडसर पेस्ट बनवा आणि ही भांड्यात काढून घ्या. यावेळी पॅन गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यानंतर त्यात कांदा घाला. काही वेळ कांदा चांगला शिजवून घ्या आणि नंतर त्यात बनवलेल्या पेस्टचे मिश्रण घालून मंद आचेवर हे मिश्रण शिजवून घ्या. या चटणीचा सुंगध येऊ लागला की गॅस बंद करा. तयार कांद्याची चटणी भाकरी किंवा चपातीसह सर्व्ह करा.