दररोज भाजी आणि पोळी खाऊन अनेकांना कंटाळा येतो व काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. त्यातच भेंडीची भाजी ही अनेकांच्या घरी बनवली जाते. पण, ही भाजी खाण्याचा अनेक जण कंटाळा करतात. पण, नेहमीच्या भाज्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या की, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडतात. तर आज आपण एक रेसिपी पाहणार आहोत, जी भेंडी न खाणारेसुद्धा आवडीने ट्राय करून पाहतील. तर या रेसिपीचे नाव आहे ‘कुरकुरे भेंडी.’ चला तर पाहूयात या अनोख्या पदार्थाची सोपी रेसिपी.

साहित्य:

 • भेंडी – ५०० ग्रॅम
 • बेसन पीठ – २ चमचे
 • कॉर्न फ्लोअर – १ चमचा
 • तांदळाचे पीठ – १ चमचा
 • लाल मिरची पावडर – १.५ चमचा
 • हळद – १/२ चमचा
 • गरम मसाला – १/२ चमचा
 • आमचूर पावडर – १/२ चमचा
 • चाट मसाला – १/२ चमचा
 • तेल
 • चवीनुसार मीठ

हेही वाचा…नॉनव्हेज लव्हर आहात? तर नक्की बनवा ‘टेस्टी चिकन सूप’; तुमचा वीकेंड होईल खास

कृती :

 • सगळ्यात पहिल्यांदा भेंडी उभी चिरून घ्या.
 • त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोअर, बेसन पीठ घाला आणि मिक्स करा.
 • नंतर त्यात लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि मिक्स करा.
 • या मिश्रणावर पाण्याचे काही थेंब शिंपडा व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
 • कढईत तेल गरम करायला ठेवा व त्यात या भेंडी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
 • अशाप्रकारे तुमची ‘कुरकुरे भेंडी’ तयार.
 • सोशल मीडियावर हा व्हिडीओ @indiancuisinecorner या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आला आहे.

व्हिडीओ नक्की बघा :