How to make Beetroot Bhaji: एखादा पुलाव किंवा बिर्याणी बनवली की, त्याच्याबरोबर सॅलड हे हमखास असतं.यात काकडी,गाजर बरोबर बीट सुद्धा आवर्जुन दिले जाते. कारण अनेकांना बीट मनापासून आवडत नाही. त्याप्रमाणेच एखाद्या पदार्थाला नैसर्गिक लाल रंग द्यायचा असेल तर हमखास बीटाचा वापर केला जातो. बीटामुळे पदार्थाला लालचुटुक रंग येतो. त्याचप्रमाणे अनेक गृहिणी बीटापासून वेगवेगळे पदार्थ देखील बनवतात ; यामध्ये बीटाचा हलवा, बीटाची कोशिंबीर, बीटाची बर्फी, बीटाचे पराठे इत्यादी. तर आज आपण बीटाची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला तर पाहुयात बीटाची भाजी कशी बनवायची ते.

साहित्य –

Sonakshi Sinha Talks about wedding look
सोनाक्षी सिन्हाने भरजरी लेहेंग्याऐवजी लग्नात साडी का नेसली? घरीच का बांधली लग्नगाठ? म्हणाली, “झहीर आणि मला…”
Weight Loss Drinks
Weight Loss Tips: ‘या’ पेयाने झपाट्याने होईल तुमचे वजन कमी; सेवनाची व बनविण्याची ‘ही’ पद्धत फक्त एकदा समजून घ्या…
Kundali Predictions For Wedding Muhurta
कुंडलीवरून तुम्हाला कसा जोडीदार मिळणार हे कसे ओळखावे? लग्नानंतर कसे असेल जीवन? ज्योतिष अभ्यासक सांगतात..
mazhi maitrin
माझी मैत्रीण : गुलबकावलीचं फूल!
Widowed women need to be able and strong
तू चाल पुढं तुला गं सखे भीती कुणाची…
Sanjeeda Shaikh
”हीरामंडी’ फेम अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीने घटस्फोटाबद्दल सोडलं मौन; म्हणाला, “आमच्या दोघांमधील गोष्टी…”
Can Anger Cause Heart Attack
खूप रागावल्यावर खरंच हृदयविकाराचा झटका येतो का? तळपायाची आग मस्तकात जाताना नेमकं शरीरात घडतं काय?
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : अन्नदाता म्हणायचे, पण हमीभाव द्यायचा नाही

१. पाव किलो बीट
२. दोन कांदा
३. एक टोमॅटो
४. जिरं, मोहरी, कडीपत्ता
५. हळद, मीठ, तिखट मसाला

हेही वाचा…मूग डाळीचा बनवा ‘हा’ पौष्टीक पदार्थ; मऊ अन् पचायलाही हलका; साहित्य, कृती लगेच लिहून घ्या

कृती –

१. पाव किलो बीट बाजारातून आणा.
२. त्यानंतर बीट स्वछ धुवून घ्या व साल काढून घ्या.
३. नंतर बीट किसून घ्या.
४. दोन कांदे, एक टोमॅटो बारीक चिरून घ्या.
५. कढई घ्या. त्यात एक चमचा तेल घाला व त्यात जिरं, मोहरी, कडीपत्ता घालून परतवून घ्या.
६. नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो घाला. कांदा, टोमॅटो जरासा लालसर झाला की त्यात तिखट मसाला टाका.
७. नंतर हळद, मीठ घाला.
८. नंतर किसून घेतलेला बीट घाला.
९. वाफेवर १० मिनिटे शिजू द्या.
१०. अशाप्रकारे तुमची बीटाची पौष्टीक भाजी तयार.

तुम्ही बीटाचे पराठे देखील बनवू शकता. रेसिपी लिहून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा…फक्त पाव किलो बीट वापरा अन् बनवा बीटाचा मऊसूत पराठा; पाहा सोपी रेसिपी

बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे –

बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. नावडतीचं हे बीट अत्यंत पौष्टिक असून ते खाण्याचे काही गुणकारी फायदे आहेत. हे फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊ . बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे व खनिजे यांसारखे पोषक घटक भरपूर असतात. बीट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर व जीवनसत्त्व क यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. नियमित आहारात बीटचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते.