scorecardresearch

Premium

भेंडीची मिळमिळीत भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग करुन पाहा ‘भेंडीचा झणझणीत ठेचा’

Bhendi Thecha Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नसेल तर तर तुम्ही भेंडीचा नक्की ट्राय करुन बघा

Bhendi thecha recipe in marathi
भेंडीची मिळमिळीत भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग करुन पाहा भेंडीचा झणझणीत ठेचा (PHOTO – Sarita's Kitchen youtube)

भेंडीची भाजी खूप लोकप्रिय आहे, अनेकजण ती आवडीने खातात. पण काहींना ही अजिबात आवडत नाही, भेंडीतील बुळबुळीतपणामुळे ही भाजी खाणे अनेकजण टाळतात. पण भेंडीपासून अनेक पदार्थ तयार केले जातात. यात कुरकुरीत भेंडी, दही भेंडी, मसाला भेंडी, भेंडी फ्राय, भरलेली भेंडी असे पदार्थ चवीने खाल्ले जातात. भेंडी चवीला चिकट असली तरी त्यात शरीरासाठी आवश्यक अनेक पौष्टिक घटक असतात. पण घरी भेंडीची रोज तिच मिळमिळीत भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही भेंडीचा झणझणीत ठेचा नक्की ट्राय करु शकता. आतापर्यंत तुम्ही मिरचीचा ठेचा ऐकला असे पण भेंडीचा ठेचा पहिल्यांदाच ऐकला असेल, चला तर मग जाणून घेऊ भेंडीचा ठेचा बनवण्याची रेसिपी….

भेंडीचा ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

• शेंगदाणे १/२ वाटी
• भेंडी पांव किलो
• हिरव्या मिरच्या १०-१२
• लसूण ७-८ पाकळ्या
• जिरे १/२
• मीठ चवीनुसार
• तेल २-३ tsp
• हिंग १/२ tsp
• लिंबाचा रस १/२ लिंबू

Little girl make her own Laptop
मावशीने लॅपटॉप द्यायला नकार देताच चिमुकलीचा भन्नाट जुगाड, स्वतःसाठी बनवलेला लॅपटॉप पाहून तुम्हीही प्रेमात पडाल
shreya bugde ganpati post
लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे भावूक; म्हणाली, “पाच दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना…”
single buffalo fought lions video goes viral the king of forest lion and buffalo viral video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! एकट्या म्हशीने दिली सिंहाला टक्कर; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
young girl squeeze lemon in the eye while making reel video viral on social media
VIDEO: अतिशहाणपणा नडला! तरुणीनं चक्क डोळ्यात पिळलं लिंबू अन्…कॅमेऱ्यासमोरच भयंकर शेवट

भेंडीचा ठेचा बनवण्याची कृती

सर्वप्रथम कढईत १/२ वाटी शेंगदाणे भाजून प्लेटमध्ये वाटून घ्या. यानंतर कढईत दोन चमचे तेल गरम करा, तेल चांगले गरम होताच त्यात १० ते १२ तिखट आणि कमी तिखट अशा मिरच्या भाजून घ्या. यानंतर ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या, १ चमचा जिरं चांगले परतून घ्या.

यानंतर यातील मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या प्लेटमध्ये काढा आणि त्यात तेलात चिरलेली भेंडी टाका आणि चिकटपणा जाईपर्यंत भाजून घ्या. आता गॅस बंद करा.

यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे आणि जिर, मिरची आणि लसूण टाकून जाडसर वाटून घ्या. यानंतर त्या भाजलेली भेंडी आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा सर्व मिश्रण जाडसर वाटून घ्या.

यानंतर पु्न्हा कढईत दोन चमचे तेल गरम करुन घ्या आणि त्यात मिक्सरने वाटून तयार केलेला खरटा मंद आचेवर भाजून घ्या. यात तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रस टाकू शकता. अशाप्रकारे तयार झाला झणझणीत भेंडीचा ठेचा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Try out bhendi cha thecha recipe okra thecha how to make okra thecha recipe sjr

First published on: 02-10-2023 at 14:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×