Upvasache Ghavan : उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही उपवासाला नवीन काहीतरी ट्राय करू शकता. तुम्ही वरई आणि साबुदाणापासून बनविलेले स्वादिष्ट घावन बनवू शकता. हे घावन अत्यंत पौष्टिक असते. आज आपण घरच्या घरी उपवासाचे घावन कसे बनवायचे, हे जाणून घेऊ या.
साहित्य:
- वरई
- साबुदाणा
- हिरव्या मिरच्या
- नारळ
- शेंगदाण्याचा कूट
- साजूक तूप
- जिरे
- मीठ
हेही वाचा : Garlic Chutney : झणझणीत अन् चटकदार लसणाची चटणी कशी बनवावी? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

पितृपक्ष नैवद्य थाळीसाठी चणा डाळीचे वडे करताय? असे बनवा स्वादिष्ट वडे, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

Banana Peel: केळ्याची साल कधीच फेकू नका, ‘या’ जुगाडू पद्धतींनी वापरून पाहा वाचतील शेकडो रुपये

पौष्टिक अडई डोसा खाल्ला का? ही सोपी रेसिपी लगेच नोट करा अन् घरीच झटपट बनवा

१ वाटी बेसन, दह्यासह ‘हा’ पदार्थ वापरून तांब्याची भांडी करा लख्ख; दिवा, ताम्हण घासायचे कष्टच नाही, Video पाहा
कृती :
- साबुदाणा आणि वरई एकत्र ४-५ तास भिजवून ठेवावी.
- त्यानंतर साबुदाणा आणि वरईमध्ये मिरची, खोबरे, शेंगदाणे, मीठ टाकावे आणि मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे.
- हे मिश्रण घट्ट भिजवावे.
- एका नॉनस्टीक तव्याला तूप किंवा तेल लावावे.
- आणि पातळसर मिश्रण तव्यावर टाकावे.
- कडेने तूप सोडावे
- हे गरमागरम घावन तुम्ही आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.