scorecardresearch

Premium

Vat Purnima 2023: वटपोर्णिमा स्पेशल व्हेज थाळी; पाहा पुरणपोळीसह संपूर्ण स्वयंपाकाची सोपी रेसिपी

Vat Purnima 2023: या वटपौर्णिमेला काय स्पेशल करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर चला पाहुयात वटपोर्णिमा स्पेशल थाळी.

vatapaurnima special reipe thali
वटपौर्णिमा स्पेशल व्हेज थाळी रेसिपी मराठी

ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. यावर्षी हा सण ३ जून रोजी साजरा केला जाईल. या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दिर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी उपवास पकडून वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी गृहीणी स्पेशल असे पदार्थही बनवते. वाटपौर्णिमेच्या दिवशी पुरणपोळी , आमरस , आंबट गोड तिखट चवीची कटाची आमटी, सोबत बटाटा भाजी किंवा मेथी भाजी , वरण भात , चटणी , पापड, गव्हाची कुरडई , भजी तळण असा बिना कांदा लसूण संपूर्ण पुरणपोळी स्वयंपाक बनवून देवाला नेवेद्य दाखवला जातो, त्यानंतर उपवास सोडला जातो. या वटपौर्णिमेला काय स्पेशल करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर चला पाहुयात वटपोर्णिमा स्पेशल थाळी.

पुरण पोळी रेसिपी

 • चणा डाळ २ वाटी
 • गूळ २ वाटी
 • वेलची पूड १/२ चमचा
 • कणिक २ वाट्या
 • मीठ
 • तेल २ चमचे

कटाची आमटी रेसिपी

 • वाटण
 • ओले खोबरे
 • आले , कोथिंबीर
 • जिरे १ चमचा
 • फोडणीसाठी तेल ४ चमचे
 • मोहरी १ चमचा
 • जिरे १/२ चमचा
 • कढीपत्ता,, कोथिंबीर हिंग
 • हळद १/४ चमचा
 • मिरची पावडर १ चमचा
 • गोडा मसाला १ चमचा
 • चिंचेचा कोळ २ चमचे
 • गूळ थोडा
 • मीठ

वरण रेसिपी –

 • तूर डाळ १/४ वाटी
 • हिंग २ चिमटी
 • हळद १/४ चमचा
 • मीठ

कोबीची भजी रेसिपी

 • चिरलेला कोबी १ कप
 • बेसन १ कप
 • मीठ, मिरची
 • ओवा १/२ tsp
 • हळद १/४ tsp
 • तळण्यासाठी तेल

कैरीची चटणी

 • कैरी १/४ वाटी
 • ओले खोबरे १/४ वाटी
 • कोथिंबीर २ tbsp
 • मीठ, जिरे
 • आले , कढीपत्ता ४-५
 • हिरवी मिरची १

बटाटा भाजी रेसिपी

 • ३ बटाटे
 • मीठ, हळद अर्ध चमचा
 • मिरची पूड १ चमचा
 • धने पूड दीड चमचा
 • गरम मसाला १/२ चमचा
 • दही २-३ चमचे
 • तेल ३ चमचे
 • जिरे १ चमचा
 • हिंग १/४ चमचा

हेही वाचा – Puran Poli Recipe : टेस्टी खव्याची पुरणपोळी कधी खाल्ली का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

आमरस रेसिपी

 • आंबे २,३
 • मीठ किंचित
 • साखर गरजेप्रमाणे

यंदाच्या वटपौर्णिमेला ही स्पेशल सात्विक अशी थाळी नक्की ट्राय करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vat purnima 2023 special maharashtrian veg puranpoli katachi amati amaras puri thali tasty recipe in marathi srk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×