Schezwan Chutney Recipe: चायनीज हे भारतात आता सर्वत्र फेमस असे खाद्य झाले आहे. मुंबईच्या वडापावच्या गाड्यांना टक्कर देणारे चायनीजचे स्टॉल आता गल्लोगल्ली पाहायला मिळतात. मुंबई- पुण्यातच नाही तर अगदी गावोगावी चायनीजची हवा आहे. चायनीजला चव देण्याचा सिक्रेट मसाला म्हणजेच शेजवान चटणी. अलीकडे अनेकजण घरी फ्राईड राईस, नूडल्स बनवतात पण शेजवान चटणी नसली तर मज्जा येत नाहीच, हो ना? बरं ही शेजवान चटणी विकत आणायची तर त्याला उगाच एक लोणचं/ जाम सारखी प्रक्रिया केलेली चव येते. अशावेळी सगळ्यात बेस्ट मार्ग म्हणजे स्वतः घरी झणझणीत शेजवान चटणी बनवणे. मंडळी आज आपण झटपट शेजवान चटणीची सोपी रेसिपी पाहणार आहोत. अगदी मोजकं सामान आणि कमी मेहनतीची शेजवान चटणी रेसिपी पाहुयात..

शेजवान चटणी साहित्य

लाल टोमॅटो, काश्मिरी बेडगी मिरची, (सुकी लाल), आलं, लसूण व्हिनेगर, गूळ, सोया सॉस, लिंबू व मीठ

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?

शेजवान चटणी कृती

  • लाल टोमॅटो कापून त्यातील बिया काढून घ्या.
  • स्मोकी फ्लेव्हर येण्यासाठी टोमॅटो गॅसवर थोडे भाजून घ्या. एका बाजूला मिरची कोमट पाण्यात भिजवून ठेवा. मिरचीचे देठ काढून टाका.
  • भाजलेला टोमॅटो व मिरची एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. तुम्हाला आवडीनुसार पेस्ट घट्ट किंवा पातळ ठेवू शकता.
  • आलं व लसणाचे अगदी बारीक तुकडे करून घ्या पण थोडं जाडसर राहू द्या. अगदी पेस्ट करू नका.
  • एका कढईत तेल तापवून त्यात आलं- लसूण घाला, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व थोडा कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्या.
  • यात टोमॅटो- मिरचीची पेस्ट घाला. तेल व पेस्ट वेगळी होईपर्यंत नीट भाजून घ्या. यात थोडे पाणी, गूळ, मीठ घालून नीट एकत्र करून घ्या.
  • गॅस बंद करण्याच्या आधी थोडा सोया सॉस व व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून अगदी किंचित शिजवून घ्या.
  • शेजवान चटणी तयार आहे.

हे ही वाचा<< दावणगिरी ज्वारी डोश्याने दिवस करा सुरु; डायबिटीज रुग्णांसाठी तर बेस्टच! पाहा झटपट रेसिपी

ही चटणी तुम्ही भात- चपातीसह खाऊ शकता. तसेच मोमोज, नूडल्सबरोबरही खाऊ शकता. साध्या जेवणाला वेगळा ट्विस्ट देण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी होते कळवा!