how to make nachanichi idali : काही वर्षांपूर्वी लोक ज्वारी, बाजरी आणि नाचणीसारखी धान्ये खाणे टाळत असत. पण काळाच्या ओघात म्हणा किंवा हेल्दी राहण्यासाठी लोकं ज्वारी, बाजारी, नाचणी या धान्यांकडे वळू लागले आहेत. आजपर्यंत तुम्ही नाचणीची भाकरी अनेकदा खाल्ली असेल. पण, आज आपण नाचणीची इडली कशी बनवायची याबद्दल जाणून घेणार आहोत.
साहित्य
- १ कप नाचणी
- ½ कप उडीद डाळ
- ½ कप तांदूळ
- ½ चमचा मेथीचे दाणे
- २ चमचे पोहे
- चवीनुसार मीठ
व्हिडीओ बघण्यासाठी फोटोवर क्लिक करा…

कृती
- सर्व काही (नाचणी, उडीद डाळ, तांदूळ, मेथी दाणा, पोहे) धुवून ६ ते ७ तास एकत्र भिजवा.
- थोडे थोडे पाणी घालून मऊसर पीठ बनवा.
- झाकून ठेवा आणि रात्रभर आंबवा (८ ते १० तास).
- दुसऱ्या दिवशी सकाळी मीठ घाला, हलक्या हाताने मिसळा.
- ग्रीस केलेल्या इडलीच्या साच्यात घाला आणि १०-१२ मिनिटे वाफ घ्या.
- मऊ, निरोगी नाचणीची इडली तयार आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @foodmagicbyankita या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

