Amla and Beetroot Mukhwas : अलिकडे लग्नकार्यामध्ये जेवण झाल्यानंतर मुखवास हा दिला जातो. विशेष म्हणजे या मुखवासातही विविध प्रकार असल्याचं पाहायला मिळतं. बडीशेपचे वेगवेगळे प्रकार, काही पचनक्रिया सुरळीत करणाऱ्या चटपटीत गोळ्या, वाळवलेला आवळा किंवा खास लहान मुलांसाठी चॉकलेट्स हे हमखास पाहायला मिळतं. जेवणानंतर बडीशेप खाणं हा ट्रेण्ड नसून पूर्वापार चालत असेली एक पद्धत आहे. जेवण झाल्यानंतर पचनक्रिया सुरळीत रहावी यासाठी बडीशेप खाल्ली जाते. तर आज आपण आवळा आणि बीटापासून मुखवास कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत…
साहित्य
- पाव किलो आवळा
- पाव किलो बीट
- आवळा आणि बीट
- जिरं, मीठ, चाट मसाला, काळं तिखट, लाल तिखट, साखर, मिरे
- आलं
व्हिडीओ नक्की बघा…
कृती
- एकीकडे आवळा किसून घ्या आणि बीट सोलून मग त्याला किसून घ्या.
- त्यानंतर आवळा आणि बीट मिक्स करून एका ताटात ठेवा.
- दुसरीकडे जिरं, मीठ, चाट मसाला, काळं तिखट, लाल तिखट, साखर, मिरे कुटून पावडर करून घ्या.
- नंतर तयार पावडर आवळा आणि बीटच्या मिश्रणात घाला.
- त्यात आलं किसून घाला आणि दोन दिवस उन्हात ठेवा.
- नंतर मग काचेच्या बरणीत भरून ठेवा.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @krantis_kitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
