batatyachya chaklya recipe : घरात बटाटा असेल तर कधीच जेवायला काय करू किंवा रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय असं म्हणण्याची वेळ येत नाही. याचं कारण म्हणजे एकतर बटाट्यापासून असंख्य रेसिपी बनवता येतात. भाजी, भजी, कोफ्ता, काप, भातात तर कधी आमटीत, रस्स्यात, बेसनाच्या पोळ्यात सहकलाकाराची भूमिका देत सुद्धा बटाटा वापरता येतो. तर आज सोशल मीडियावर एका @kalpanakitchenin इन्स्टाग्राम अकाउंटवरून जबरदस्त रेसिपी शेअर करण्यात आली आहे; ज्याचे नाव आहे बटाट्याच्या चकल्या…
साहित्य
- २ उकडलेले बटाटे
- १ कप तांदळाचं पीठ
- १ चमचा लाल तिखट
- ½ चमचा हळद
- एक चमचा जिरे
- कोथिंबीर
- मीठ
- तेल
हेही वाचा
व्हिडीओ नक्की बघा
कृती
- सर्वप्रथम बटाटे उकडवून घ्या.
- नंतर उकडलेले बटाटे मॅश करून घ्या.
- त्यात तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, जिरे आणि मीठ घाला.
- थोडंसं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या.
- चकली साच्यातून तेलात गोल चकल्या काढा.
- मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा.
- अशाप्रकारे तुमच्या कुरकुरीत बटाट्याच्या चकल्या तयार…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kalpanakitchenin या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
