rice flour dosa recipe : रविवार असो किंवा आणखीन कोणता दिवस नाश्त्यासाठी सर्वाधिक दक्षिण भारतीय पदार्थ खाणे पसंत केले जातात. उपमा, इडली, मेदूवडा, डोसा, शिरा, उत्तप्पा हे पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम तर आहेतच; पण ते पचायलाही हलके असतात. त्यामुळे हे पदार्थ प्रत्येक घरात अगदी आवर्जून बनवले जातात. त्याचप्रमाणे दररोज स्टेशनच्या बाहेर, ऑफिसच्या खाली तर अनेक स्टॉलवरही हे पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि ग्राहक देखील याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. तर आज आपण तांदळाच्या पिठाचा डोसा बनवणार आहोत….
साहित्य
- तांदळाचं पीठ – २ कप
- रवा – २ चमचा
- जिरं – १ चमचा
- कांदा – ½ कप
- गाजर (किसलेलं) – ¼ कप
- मिरची (चिरलेली) – १ चमचा
- कढीपत्ता – ६-७ पाने (चिरलेली)
- कोथिंबीर – ¼ कप (चिरलेली)
- काळी मिरी पावडर – ¼ टीस्पून
- मीठ – १ टीस्पून (चवीनुसार)
- पाणी – ८ कप
- तेल
व्हिडीओ नक्की बघा…
कृती
- तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात रवा, जिरे, कांदा, गाजर, मिरची कडीपत्ता, कोथिंबीर, काळीमिरी पूड, मीठ, पाणी टाकून मिश्रण एकजीव करा आणि बॅटर बनवून घ्या.
- पॅनमध्ये तेल घ्या आणि गरम तव्यावर बॅटर ओता आणि वरून तेल टाका.
- अशाप्रकारे तांदळाच्या पिठाचा डोसा तयार.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @majhyahatachichav या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
