How To Make Cucumber Chaas: डाएटचा प्लॅन असो किंवा चिकन मटणाचा बरोबरीला काकडी, टोमॅटोची कोशिंबीर असेल तर जेवणाची रंगत वाढते. आता टोमॅटोचे भाव जरी आकाशाला भिडत असले तरी सुदैवाने काकडी मात्र बरीच स्वस्त उपलब्ध आहे. पैसे वाचतायत आणि कामही होतंय म्हणून कधीतरी तुम्हीही फार हौशीने बाजारातून काकड्या आणल्या असतील. तर आज आपण काकडी पासून बनवली जाणारी भन्नाट रेसिपी पाहणार आहोत…

साहित्य

  • दही
  • काकडी
  • पुदिन्याची पाने
  • धणे पाने
  • काळे मीठ
  • चाट मसाला
  • भाजलेले जिरे पावडर

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • काकडीचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात ठेवा.
  • नंतर त्यात पुदिना, कोथिंबीर, भाजलेले जिरे पावडर, काळे मीठ, चाट मसाला टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  • भांड्यात दही घेऊन व्यवस्थित मिक्स करा आणि त्यात पाणी घाला.
  • तयार मिश्रण त्यात मिक्स करून घ्या.
  • अशाप्रकारे काकडीचे ताक तयार.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @tastytaleswithrupal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्ही ही थंडगार रेसिपी घरी सुद्धा बनवू शकता…