how to make Cucumber Sandwich recipe : सकाळी एक ग्लास दूध, चहा-पोळी, कॉफी, पोहे असा हलका नाश्ता आपण करून सकाळी घराबाहेर पडतो. पण, रोज एकसारखा नाश्ता करून आपल्यातील अनेकांना कंटाळा येतो. पण आवाज एका इन्स्टाग्राम युजरने सकाळी ५ मिनिटांत बनवला जाणारा नाश्त्याची रेसिपी सांगतली आहे. तर आज आपण क्रीमी काकडी सँडविच रेसिपी कशी बनवायची हे पाहणार आहोत.

साहित्य

  • १ काकडी
  • लसणाच्या २ पाकळ्या
  • ३ मोठे चमचे ग्रीक योगर्ट किंवा घट्ट दही घ्या
  • १.५ लहान चमचा मेयोनीज
  • १ लहान चमचा काळी मिरी पूड
  • चवीनुसार मीठ

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • १ काकडी किसून त्यातील जास्तीचे पाणी पिळून घ्या.
  • लसणाच्या २ पाकळ्या किसून घ्या.
  • मग एका भांड्यात योगर्ट, मेयोनीज, किसलेली लसूण, मीठ आणि काळी मिरी पूड घेऊन चांगले मिसळा. त्यात किसलेली काकडी घालून पुन्हा मिश्रण एकजीव करा.
  • ब्रेडच्या कडा कापून घ्या, त्यात हे सारण भरा आणि सकाळी खा.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bong_eats_misal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.