How To Make Egg Paratha : पोळी नको पण पराठा चालेल. भाजी खायला कंटाळ; पण, त्याच भाजीचा पराठा तितक्याच आवडीने खातील. हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात गरमा गरम पराठा खाण्याची मजा काही वेगळीच असते नाही का. तर आज आपण नेहमीच्या बिट, मेथी, पालक आणि कोबी, बटाट्याला विसरून अंड्याचा पराठा कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत. हा पराठा करताना पोळी फाटण्याचे टेन्शनही दूर होणार आहे. कशी बनवायची ही रेसिपी चला जाणून घेऊयात…
साहित्य
- अंडी – २
- कांदा – १ (बारीक चिरलेला)
- हिरवी मिरची – २
- कोथिंबीर – २ चमचे
कृती
- एका भांड्यात दोन अंडी फोडून घ्या.
- मग त्यात कांदा, हिरवी मिरची, मीठ, काळीमिरी पूड घालून मिश्रण मिक्स करून घ्या.
- त्यानंतर एक चपाती घ्या.
- व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे सुरीच्या सहाय्याने त्याचे काप करून घ्या आणि तेल लावून घ्या आणि गव्हाचे पीठ वरून लावा.
- मग पोळी लाटून घ्या आणि तयार केलेल्या अंड्याच्या मिश्रणात बुडवून घ्या आणि तव्यावर ठेवा.
- अशाप्रकारे तुमचा अंड्याचा पराठा तयार.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @asmr__.10 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

