Fried Bread Potatoes Recipe : बटाटा आणि ब्रेड हा अनेकांचा जीव की प्राण असतो. म्हणजेच काही सुचलं नाही की, पटकन बटाटा आणि ब्रेड वापरून वेगवेगते वेळ व कष्ट वाचवून पदार्थ बनवता येतात. अगदी बटाट्याच्या काचऱ्या, ब्रेड रोल, ब्रेड पाव, ऑम्लेट ब्रेड, बटाटे वडे, पापड, चकल्या, ठेचा, पराठे किंवा अगदी बटाटा प्रेमी सगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा बटाटा टाकू पाहतात. त्यामुळे जी म्हणाल ती रेसिपी बटाटा आणि ब्रेड वापरून करता येते. तर आज आपण अशीच एक रेसिपी करणार आहोत, जी बटाटा आणि ब्रेड वापरून करण्यात आली आहे, ज्याचे नाव फ्राइड ब्रेड बटाटा (Fried Bread Potatoes) असे आहे.

साहित्य

  • ३ उकडलेले बटाटे
  • ४ ब्रेडचे तुकडे
  • २ मोठे चमचे – कॉर्नफ्लोअर
  • १ मोठा चमचा – चिली फ्लेक्स
  • १ छोटा चमचा – काळी मिरी पूड
  • चिरलेली कोथिंबीर
  • तळण्यासाठी तेल
  • मीठ

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • एका भांड्यात उकडलेले बटाटे चांगले मॅश करा.
  • ब्रेडचे तुकडे पाण्यात बुडवून, जास्तीचे पाणी पिळून घ्या आणि ते मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये चुरून टाका.
  • त्यात कॉर्नफ्लोअर, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घाला.
  • सर्व साहित्य चांगले मिसळून मऊ पीठ मळून घ्या.
  • पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याची एक पातळ, लांब, दंडगोलाकार नळी बनवा.
  • नळीचे लहान, घासभर आकाराचे तुकडे करा.
  • प्रत्येक तुकड्याला काट्याने हलकेच दाबून त्याला टेक्स्चर असलेला आकार द्या.
  • एका कढईत तेल गरम करून बटाट्याचे तुकडे सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • केचप किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा आणि आनंद घ्या.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @when_i_make या इस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.