Garlic Prawn Fried Rice Recipe : आपल्याकडे कोळंबी विविध प्रकारे खाल्ली जाते. काहीजण कोळंबीचे कालवण, रस्सा बनवतात. तर काही मंडळी फ्राय करून खातात. पण कोळंबी भात हा पदार्थ आपल्याकडे सर्वात जास्त लोकप्रिय आहे. मासे खाणाऱ्या लोकांसमोर कोळंबी भात असे नुसते म्हटले तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटते. अशा या चविष्ट पदार्थाची सोपी रेसिपी आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत…
साहित्य
- ५०० ग्रॅम कोळंबी
- १ चमचा मीठ
- ½ चमचा हळद पावडर
- १ चमचा काश्मिरी मिरची पावडर
- ¾ चमचा काळी मिरी पावडर
स्टिअर फ्रायसाठी
- ४-५ चमचे नारळ तेल
- ½ चमचे मोहरी
- ४ ते ६ लसूण पाकळ्या
- बारीक कापलेले कढीपत्ता
- १ चमचा कुस्करलेले लाल मिरचीचे तुकडे
- २ कप शिजवलेला भात
- चिमूटभर मेथीच्या दाण्याची पावडर
व्हिडीओ नक्की बघा…
कृती
- मीठ, हळद, मिरची पावडर आणि मिरपूड घालून कोळंबी मॅरीनेट करा.
- ३०-४५ मिनिटे तसंच राहू द्या.
- कढईत खोबरेल तेल गरम करा आणि कोळंबी ४ ते ५ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत तळा आणि नंतर काढून बाजूला ठेवा.
- त्याच पॅनमध्ये (२ चमचा तेल ठेवा), मोहरी, लसूण घाला आणि सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
- नंतर कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे, शिजवलेले भात घाला आणि चांगले मिक्स करा.
- त्यांनतर मग तळलेली कोळंबी घाला आणि हलक्या हाताने फेटा.
- सुगंधासाठी चिमूटभर मेथी पावडर घाला.
- अशाप्रकारे तुमचा कोळंबी भात तयार.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shrees_logbook या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
