Healthy Ladoo Recipe : मेथीपासून ते डिंकापर्यंत अनेक प्रकारचे लाडू घरोघरी केले जातात. त्यात बेसन, रवा, बुंदीचा लाडू आपल्याला खायला भरपूर आवडतात. पण, उन्हाळ्यात लवकर थकल्यासारखं वाटतं, खूप ऊन असल्यामुळे डोकं दुखतं. तर आज इन्स्टाग्राम युजरने एक जबरदस्त लाडू बनवला आहे. तिच्या कॅप्शननुसार तुम्ही दररोज एक लाडू खाल्ला तर डोकेदुखी, केस गळती, हाडांचे दुखणे, थकवा दूर होऊ शकतो. चला तर मग या लाडूची रेसिपी जाणून घेऊयात…

साहित्य

  • १ वाटी मुगाची डाळ
  • अर्धी वाटी पिठीसाखर
  • १ चमचा वेलची पावडर
  • २ चमचे भोपळ्याच्या बिया
  • ३ चमचे साजूक तूप

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • मुगाची डाळ ४ ते ५ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि चाळणीवर ठेवा.
  • त्यानंतर डाळ ७ ते ८ मिनिटे मध्यम आचेवर भाजून घ्या.
  • डाळ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घ्या.
  • नंतर पॅनमध्ये तूप टाकून पावडर त्यात भाजून घ्या.
  • नंतर बिया घालून त्या सुद्धा भाजून घेतल्या.
  • एका भांड्यात मिश्रण काढून घ्या आणि त्यात पिठी साखर घाला.
  • त्यानंतर लाडू वळायला घ्या.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @foodtubers_laxmi या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.