Mango kulfi recipe with milk : उन्हाच्या झळा सहन करूनही उन्हाळा आवडण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आंबा. हापूस, पायरी, तोतापुरी, रायवळ वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांनी उन्हाळा सहन करण्याचं मानसिक बळ मिळतं असं म्हणता येईल. तर आपण नेहमीच आंब्यापासून आमरस पुरी, शिरा, आंब्याचे मोदक असे अनेक पदार्थ बनवून खातो. पण, आज आपण कोणतेही जास्त पदार्थ न वापरता आंब्याची कुल्फी कशी बनवायची हे बघणार आहोत…

साहित्य

  • आंबे
  • दूध
  • बदामाची पूड
  • काजू
  • पिस्ता
  • वेलची पूड

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

  • आंबे व्यवस्थित धुवून घ्या. फक्त वरचा भाग कापून घ्या आणि आंब्यातील कोय काळजीपूर्वक काढून टाका.
  • एका पातेल्यात १ लिटर दूध उकळून घ्या. दूध सुमारे ५०० मिली होईपर्यंत आटून घ्या. त्यात बदामाची पूड, काजू, पिस्ते, वेलची पूड घाला. सर्व व्यवस्थित मिसळून घ्या आणि आणखी २ ते ३ मिनिटे शिजू द्या.
  • मिश्रण थोडे थंड होऊ द्या. नंतर कोय काढून घेतलेल्या आंब्यामध्ये मिश्रण भरा.
  • सुमारे ८ तास किंवा पूर्णपणे घट्ट होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा.
  • क्रीमी आंब्याची कुल्फी तयार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा ही रेसिपी व्हिडीओद्वारे @sadhnas.kitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.