how to make Kolambi Omelette : बटाट्याप्रमाणे अंड्यांच्या सुद्धा अनेक प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात पण सगळ्यांची आवडती आणि विशेषतः अगदी पाच मिनिटात करून होणारी रेसिपी म्हणजे ऑम्लेट. भारतीय कांदा टोमॅटो मसाला घातलेला अंड्याचा पोळा, इंग्लिश ब्रेकफास्टमधील अंड्याच्या पांढऱ्या भागाचं ऑम्लेट, किंवा हाफ फ्राय हे झटपट पदार्थ साध्या जेवणाची रंगत वाढवतात. पण, आज आपण कोळंबीचे ऑमलेट कसे बनवायचे ते बघणार आहोत.

साहीत्य

  • लहान कोळंबी – १ छोटं वाडगं
  • अंडी – ३
  • हिरव्या मिरच्या (तिखट) – ३ ते ४
  • लसूण पाकळ्या – ७ ते ८
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली
  • मिरी – १ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • बटर – तळण्यासाठी
  • ब्रेड – स्लाइस
  • हळद – २ चिमूट

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • अंडी फोडून घ्या.
  • नंतर लसूण, मिरची खलबत्यात ठेचून मग फोडून घेतलेल्या अंड्याच्या मिश्रणात टाका.
  • मग कांदा, कोथिंबीर, मिरी, मीठ घालून मिश्रण फेटून घ्या.
  • व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे पॅनमध्ये बटर घ्या आणि मग त्यात कोळंबी घालून परतवून घ्या. मग मीठ आणि हळद सुद्धा घाला.
  • नंतर फेटून घेतलेल्या अंड्याच्या मिश्रणात कोळंबी घाला.
  • त्यानंतर पॅनमध्ये बटर घ्या आणि मग ऑमलेट तयार करून घ्या.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @simplyswadisht या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.