potato onion pakoda : पावसाच्या आगमनानंतर चहा आणि भजी खाण्याचा मोह आपल्याला कोणालाच आवरत नाही. पालक, कांदा, बटाटा, मूग डाळ, कोबी यापैकी एकतरी प्रकारचे भाजी किंवा पकोडे आपण नक्की बनवून बघतो. तर आज आपण नेहमीच्या भजीला थोडा ट्विस्ट देऊन बटाटा-कांदाची मिक्स भाजी कशी बनाव्याची याबद्दल जाणून घेणार आहोत. @batati.being.batati या इन्स्टाग्राम युजरने या पदार्थाची सगळ्यात सोपी रेसिपी शेअर केली आहे.

साहित्य

  • १ १/२ कप पातळ उभे चिरलेले कांदे
  • १ १/२ कप जाड किसलेले बटाटे
  • २ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • २ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
  • १/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १/२ टीस्पून जिरे
  • १ चमचा चाट मसाला
  • १ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा हळद
  • १/२ चमचा धणे पूड
  • १ चमचा लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • १/४ कप बेसन (हरभऱ्याच्या डाळीचे पीठ)
  • २ चमचा तांदळाचे पीठ
  • तळण्यासाठी तेल

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • एका भांड्यात कांदे, बटाटे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे, चाट मसाला, लाल तिखट, हळद, धणे पूड, लिंबाचा रस, मीठ, बेसन, तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर कढईत किंवा पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यानंतर मिश्रणाचे छोटे-छोटा भाग तेलात सोडा आणि कुरकुरीत झाल्यानंतर बाहेर काढा.
  • अशाप्रकारे तुमची बटाटा-कांदा भजी तयार.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा रेसिपीचा व्हिडीओ @batati.being.batati या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.