Crispy Prawns fry recipe : कोळंबी हा मासा आपल्याकडे खूप आवडीने खाल्ला जातो. कोळंबीपासून कोळंबी भात, कोळंबीचा रस्सा, कोळंबीचे कालवण, कोळंबी फ्राय असे अनेक पदार्थ बनवले जातात. तर आज आपण कुरकुरीत कोळंबी फ्राय ही झटपट होणारी रेसिपी कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत…
साहित्य
कोळंबी, लिंबाचा रस, मीठ आणि आले-लसूण पेस्ट, मैदा, मीठ, काळ्या मिरीची पूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद, ओरेगॅनो, २ अंडी, ब्रेड क्रम्स आणि तेल
कृती
मॅरिनेशनसाठी
कोळंबीवर लिंबाचा रस, मीठ आणि आले-लसूण पेस्ट लावून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
कोळंबीच्या बाहेरील आवरणासाठी…
एका ताटात मैदा, मीठ, काळ्या मिरीची पूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद, ओरेगॅनो
तर दुसऱ्या वाटीत २ अंडी फेटून घ्या आणि तिसऱ्या बाउलमध्ये ब्रेड क्रम्स अशी तीन मिश्रणे बनवून घ्या आणि तिन्हीमध्ये कोळंबी व्यवस्थित बुडवून घ्या.
नंतर पॅनमध्ये तेल घेऊन त्यात कुरकुरीत तळून घ्या.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा ही रेसिपी व्हिडीओद्वारे @sadhnas.kitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.
