how to make thepla : प्रवासात काय घेऊन जायचं, आयत्या वेळी भूक लागल्यावर काय बनवायचं हा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतो. पोहे, शिरा अगदी २ मिनिटांत होणारी मॅगी सुद्धा खाऊन आणि बनवून आपल्यातील प्रत्येकाला कंटाळा आला आहे. तर आज आपण एक खास रेसिपी बघणार आहोत, जी एका इन्स्टाग्राम युजरने दाखवली आहे, जी बनवायला देखील अगदी सोपी आहे.
साहित्य
- १ कप गव्हाचे पीठ
- २५० ग्रॅम मऊ पनीर
- १ कप किसलेली दुधी भोपळा
- १ चमचा जिरे-धणे पूड
- १ चमचा लाल तिखट (मिरची पूड)
- १/२ चमचा हळद
- १ चमचा हिंग
- १ चमचा तीळ
- १ कप मेथीची पाने किंवा कोथिंबीर
- १ ते १/२ चमचा हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट
- २ ते ३ चमचा तेल
- चवीनुसार मीठ
- तेल
व्हिडीओ नक्की बघा…
https://www.instagram.com/angel__veg_buffet/reel/DWWGQb4ERhG

कृती
- मेथीची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
- दुसरीकडे एका मोठ्या भांड्यात (mixing bowl) गव्हाचे पीठ, सर्व मसाले, कोथिंबीर, मऊ पनीर (टोफू) आणि तेल एकत्र करा.
- नंतर पीठ मळून घ्या. पीठ मळताना ते मऊ असावे, पण खूप चिकट नसावे याची खात्री करा.
- पिठाचे गोळे करून लाटून घ्या.
- मळलेल्या पिठाचे लिंबाच्या आकाराचे लहान गोळे तयार करा.
- प्रत्येक गोळा दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये दाबून चपटा करा आणि नंतर लाटण्याच्या साहाय्याने त्याची पातळ गोल पोळी (थेपला) लाटून घ्या.
- थेपले भाजून घ्या. प्रत्येक थेपला गरम तव्यावर (skillet) थोडे तेल सोडून, दोन्ही बाजूंनी सोनेरी-तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
हे थेपले काही दिवस ताजे आणि मऊ राहतात; त्यामुळे प्रवासात बरोबर घेऊन जाण्यासाठी किंवा घाईच्या वेळी पटकन खाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @angel__veg_buffet या इस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
