how to make Summer special paratha : लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेकांचा मुलांचा आवडता नाश्ता म्हणजे पराठा… गरमागरम, मऊ आणि चविष्ट आलू पराठा म्हटलं की, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यात देण्यासाठी हा पराठा आईला बनवायला सोयीस्कर सुद्धा असतो. अनेक तरुण मंडळींना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. मग आई त्याचा पराठा बनवून देतो. पण, आज आपण एक अनोख्या पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत जी बटाटे, पनीर आणि कोथिंबीर पासून बनवण्यात आली आहे.

साहित्य

  • ३ उकडलेले बटाटे
  • १०० ग्रॅम पनीर
  • १ मध्यम आकाराचा कांदा
  • चिरलेली कोथिंबीर
  • सिमला मिरची (कॅप्सिकम)
  • चवीनुसार हिरवी मिरची
  • धणे-जिरे-ओवा (एकत्र कुटलेले)
  • साहित्याच्या प्रमाणानुसार पीठ
  • काजू

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • एका भांड्यात कोथिंबीर, बटाटे, पनीर, हिरवी मिरची, कांदा, धणे-जिरे-ओवाची पावडर, काजू, बेसन आणि गव्हाचे पीठ, मीठ टाकून पीठ मळून घ्या.
  • पीठ मळताना व्हिडीओत पाण्याचा वापर केलेला नाही; तरीही जर पीठ मळताना खूपच कडक वाटले, तर तुम्ही अगदी थोडे पाणी वापरू शकता.
  • त्यानंतर पिठाचे गोळे करून घ्या आणि पराठे लाटून घ्या, तव्यावर भाजून घ्या आणि मग सेवन करा.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kitchenlyyours_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.