Cheesy Garlic Bread Recipe : भरपूर चीज घातलेला ‘चीझी गार्लिक ब्रेड’ कोणाला नाही आवडतं. लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळेच अगदी भरपूर आवडीने खातात. ‘एक दिवस खाल्लं तर काय होतंय’ असं म्हणून आपण झोमॅटो, स्विगीवरून देखील मागवतो आणि त्याची चव चाखून पाहतो. पण, तुम्ही ओव्हन नसेल तरीही हा चीझी गार्लिक ब्रेड अगदी सहज घरी बनवू शकता. इन्स्टाग्रामवर @foodiesfood_court या युजरने सोपी रेसिपी दाखवली आहे, जी तुम्ही घरी करून पाहू शकता…

साहित्य –

  • तेल
  • लसूण – १ कप
  • तीन चमचे बटर
  • चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो
  • कोथिंबीर
  • पाव
  • चीज
  • पाणी
  • चिली ऑइल

कृती –

  • लसणाच्या पाकळ्या सोनेरी होईपर्यंत तेलात तळून घ्या.
  • त्यानंतर काट्या चमच्याने त्याला कुस्करून घ्या.
  • बटर, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो घालून पेस्ट करून घ्या.
  • त्यानंतर पावाच्या लादीला मधोमध कापून घ्या.
  • त्याच्यावर पेस्ट लावा.

व्हिडीओ नक्की बघा…

चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो, चीज वरून टाका.
पॅनमध्ये बटर लावा आणि मग पावाची लादी त्यावर ठेवा.
झाकण ठेवून, मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवून घ्या.
अशाप्रकारे तुमचा चीझी गार्लिक ब्रेड तयार…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @foodiesfood_court या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.