stuffed omelette recipe : सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न अनेकांना पडतो. नाश्ता फक्त पोटभरण्यासाठीच नाही तर हेल्दी असणेही आवश्यक असते आणि दररोज तेच तेच खाऊन अनेकांना कंटाळाही येतो. त्यात अंड हा एकमेव पर्याय समोर येतो. अंड व्हेज की नॉन-व्हेज हा वाद कितीही जुना असला, तरी ऑम्लेटची क्रेझ आजही तितकीच टिकून आहे. अनेक जणांचा सकाळचा नाश्ता म्हणजे गरमागरम ऑम्लेट. चविष्ट, मऊ आणि फुललेलं ऑम्लेट तयार करण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत…

साहित्य

  • अंडी
  • मीठ
  • मिरपूड
  • चीज
  • मशरूम
  • चीज
  • हिरव्या मिरच्या
  • दूध
  • बटर

कृती

  • अंडी फोडा, त्यात दूध घाला आणि फेटून घ्या.
  • मग मीठ आणि मिरपूड घाला
  • मशरूम बटरमध्ये परतून घ्या.
  • अंड्याचे फेटून घेतलेले मिश्रण पॅनमध्ये ओता आणि त्यात चीजचे तुकडे ठेवा.
  • बारीक कापून घेतलेल्या मिरच्या घाला. ऑमलेट घडी करा, शिजवा आणि खाण्याचा आनंद घ्या.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @hungryhumansofindia या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे..