Sweet Potato Ice Cream : रताळी विशेषत: उपवासाला खाल्ली जातात. पण, बरेच जण दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्यास प्राधान्य देतात. रताळी सामान्यतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त उपलब्ध असतात; तर काही प्रदेशांत उन्हाळ्यातही त्यांची लागवड केली जाते. तर आज आपण रताळ्या पासून बनवलेली एक खास उन्हाळा स्पेशल रेसिपी बनवून बघणार आहोत…

रताळ्याची आईस्क्रीम रेसिपी पुढीलप्रमाणे…

साहित्य

  • २ उकडलेले रताळे
  • ½ कप मध्यम आकाराचे खजूर
  • ३ चमचा कोको पावडर
  • २ चमचे गुळ पावडर / गूळ
  • चिमूटभर मीठ
  • ½ टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  • १ कप – नारळाचं दूध

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • सर्वप्रथम रताळे उकडून त्याची साल काढून घ्या आणि त्याचे छोटे काप करून घ्या.
  • आता मिक्सरच्या भांड्यात रताळ्याचे काप, खजूर आणि उरलेले सर्व साहित्य घाला.
  • सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत फिरवा.
  • तयार झालेले मिश्रण एअरटाईट डब्यात काढा आणि फ्रिजरमध्ये ८ ते १० तास किंवा रात्रभर सेट होण्यासाठी ठेवा.
  • आईस्क्रीम पूर्ण सेट झाल्यानंतर बाहेर काढा आणि सर्व्ह करा.
  • वरून पिस्त्याचे काप घालून गार्निश करा.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ashwinisrecipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.