Sweet Mango Shrikhand Recipe : उन्हाळ्यात हापूस, पायरी, तोतापुरी, रायवळ वेगवेगळ्या प्रकारच्या आंबे खाण्याची मजा काही तरी वेगळी असते. पण, जर तुम्हाला सांगितलं की, हा आंबा जर एका विशिष्ट पद्धतीने खाल्ला तर मनाला आनंदही मिळतो. ही पद्धत म्हणजे ‘मँगो श्रीखंड किंवा आम्रखंड’. नाव वाचून कठीण वाटतंय. पण, खरंतर ही रेसिपी बनवायला अगदीच सोपी आहे. आज आपण ही रेसिपी कशी बनवायची हे पाहणार आहोत…

आंब्याचा श्रीखंड कसे बनवायचे?

साहित्य

  • १ किलो दही
  • वेलची पूड
  • कापलेले सुकामेवा
  • चवीनुसार पिठीसाखर
  • २ आंबे
  • केसर

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • एका स्वच्छ मातीच्या भांड्यात पातळ स्वच्छ कापड अंथरा. त्यात ताजं दही ओता.
  • आता कापडाच्या चारही बाजू एकत्र घेऊन घट्ट बांधा. हे बांधलेलं कापड ४-५ तास भांड्यावरच ठेवून त्यातले पाणी निघू द्या.
  • दह्यातील अतिरिक्त पाणी मातीच्या भांड्यात खाली जमा होईल.
  • कापड उघडल्यावर आत घट्ट, मऊ चक्का तयार झालेला दिसेल.
  • त्यानंतर आंब्याचे बारीक तुकड्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या.
  • चक्का मोठ्या भांड्यात घ्या आणि चमचा, व्हिस्क किंवा बीटरने गोल-गोल फिरवत फेटा.
  • मग पिठीसाखर, आंब्याचा रस पिठीसाखर, वेलची पूड आणि केशर घालून पुन्हा चांगले मिक्स करा.

सोशल मीडियावर ही रेसिपी व्हिडीओद्वारे @myflavourfuljourney या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.