तुम्हाला लोकप्रिय केटोजेनिक किंवा “केटो” डाएट म्हणजे काय आहे माहित आहे का? हा असा डाएट आहे ज्यामध्ये कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि जास्त प्रमाणात फॅट असलेल्या पदार्थांचा समावेश होतो. तुम्ही जर केटो डाएट फॉलो करत असाल आणि तुम्हाला नॉनव्हेज विशेषत: चिकन खायला आवडतं असेल तर तर तुमच्यासाठी खास रेसिपी आमच्याकडे आहे. तुम्ही बऱ्याचदा बाहेर जाऊ चिकन लॉलीपॉप खात असाल पण आता तुम्ही ही रेसिपी घरीच तयार करू शकता कारण ही रेसिपी फार अवघड नाही. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी
चिकन लॉलीपॉप केटो स्टाइल रेसिपी
साहित्य- चिकन लॉलीपॉप ६. मिरपूड पाव चमचा, आलं लसूण पेस्ट १ चमचा तिखट अर्धा चमचा, चिकन मसाला १ चमचा, १ अंडे, सोया सॉस १ लहान चमचा. मीठ चवीनुसार, कॉर्न फ्लोअर अगदी थोडे, रिफाईड सोया पावडर १ चमचा




हेही वाचा – बुलेटप्रूफ कॉफी प्यायली आहे का कधी? नसेल तर मग एकदा ट्राय करून पाहा, ही घ्या रेसिपी
कृती- एका भांड्यात अंडे फोडून त्यात, मिरपूड, आलं लसूण पेस्ट, तिखट, चिकन मसाला, मीठ घालून नीट फेटून घ्या. त्यात सोया सॉस घालून परत एकदा एकत्र करा. त्यात चिकन लॉलीपॉप घालून नीट एकत्र करून घ्या. त्यात अगदी थोडे कॉर्न फ्लोअर, रिफाइंड सोया पावडर घालून एकत्र करा. चिकनला हे अर्धा तास मॅरीनेट करा. तेलात नीट तळून घ्या चिकन आतून नीट शिजवून घ्या आणि शेजवान चटणीबरोबर खायला द्या.