23 March 2018

News Flash

विसंगतीवर अचूक भाष्य

आजच्या काळातही ‘हलाल’चा संदर्भ खूप महत्त्वाचा ठरतो.

Updated: October 7, 2017 9:46 AM

दोन जीवांमधले भांडण संपवून त्यांना सहजपणे एकत्र यायची इच्छा असेल तर जिथे कायदाही अडथळा ठरत नाही, तिथे धर्माच्या नावाखाली भयानक परिस्थितीत दोघांनाही अडकवणारा नियम अनेक प्रश्न निर्माण करतो. धर्म म्हणजे समाजासाठी आखून दिलेले नियम. म्हटले तर ते त्या व्यक्तीच्या, समाजाच्या भल्यासाठी आहेत किंवा अध:पतनासाठी. शारीरिक आणि मानसिक रीत्याही एखाद्या व्यक्तीचे चुकीच्या नियमामुळे शोषणच होणार असेल तर फक्त धर्म म्हणून त्याचे अंधानुकरण करायचे का? असे अनेक प्रश्न ‘हलाल’ पाहताना मनात दाटतात. ‘हलाल’ची कथा केंद्रबिंदू ठेवूनही दिग्दर्शकाने त्या अनुषंगाने घडणाऱ्या आजूबाजूच्या घटनांमधूनही एकूणच सगळ्या समाजाच्या विचारसरणीवरही अचूक बोट ठेवले आहे. आजच्या काळातही ‘हलाल’चा संदर्भ खूप महत्त्वाचा ठरतो.

नवऱ्याने तीनदा तलाक म्हणून माहेरी आणून सोडलेली हालीम (प्रीतम कागणे) तिच्या दोन बहिणी आणि आईवडिलांबरोबर दोन वर्षे एकटीने जगते आहे. दोन वर्षांनी तिचा नवरा कुद्दुस (प्रियदर्शन जाधव) तिला परत पत्नी म्हणून घरी घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी येऊन धडकतो. हालीमला तलाक देण्याचे त्याचे कारण त्याच्याजवळ होते आणि ते तिच्या सुखासाठीच होते. खुद्द हालीमलाही आपल्या नवऱ्याबरोबर नांदायची इच्छा आहे. मात्र आपल्याकडे एकदा तलाक दिल्यानंतर बाईला नवऱ्याक डे जाता येत नाही हा धर्माचा नियम हालीमचे बाबा (विजय चव्हाण) तिच्यासमोर उभा करतात. यातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा गावातील मौलानाचा (चिन्मय मांडलेकर) सल्ला घेतला जातो. मौलानाने दिलेला सल्ला मानून हालीम आणि कुद्दुसला एकत्र आणण्यासाठी सगळा गाव जातिधर्म विसरून एकत्र येतो. पण, या भलत्याच नियमाचे पालन करताना कुद्दुसची त्याहीपेक्षा हालीमच्या मनाची स्थिती काय होते, याचा कधीच विचार केला जात नाही. एका नवऱ्याकडून तलाक, दुसऱ्याशी निकाह आणि त्याच्याकडून पुन्हा तलाक घेऊन मग पहिल्याबरोबर नांदण्याची हालीमची अग्निपरीक्षा यशस्वी होते का? धर्म म्हणजे नीतीचे वागणे हे अपेक्षित असताना हालीमवर हा धर्म लादताना तिच्या नैतिकतेचे वाभाडे निघतील याची जाणीव कोणाला होतच नाही का? हा प्रश्न जसा दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच या नैतिकतेची चाड बाळगा.. हे सांगण्याची हिम्मतही नायिकेतच निर्माण करत अंधानुकरणापेक्षा वैचारिकतेची कास महत्त्वाची आहे हेही दिग्दर्शकाने सहज लक्षात आणून दिले आहे.

‘हलाल’ची कथा राजन खान यांची आहे. मुळात, कथेतच लेखकाने थेट प्रसंग समोर उभा करत त्यातील नेमकी विसंगती दाखवून दिली आहे. त्यामुळे चित्रपटरूपात आणतानाही दिग्दर्शकाने आपले कौशल्य वापरून ते तितक्याच थेट प्रवाही चित्रण केले असल्याने कुठेही ते नाटकी वाटत नाही. या एकाच नियमाचे दोन धर्माच्या माणसांमध्ये, तेही पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही किती वेगवेगळे पडसाद उमटतात हेही कथेच्या ओघात जाणवून दिले आहे.

हलालाचा हवाला देऊन पुरुषाला शिक्षा म्हणून सांगितले गेलेले कृत्य प्रत्यक्षात स्त्रीला मानसिक, शारीरिक दोन्ही पद्धतीने उद्ध्वस्त करते. अशावेळी समोर असलेला कुठलाच पुरुष तिचे वडील, नवरा कोणीही तिला समजून घेऊ शकत नाहीत. किंवा समजत असूनही चालिरीतीप्रमाणे प्राधान्य देतात. माझ्याकडे धर्म म्हणून नव्हे तर माणुसकी म्हणून तरी बघा.. हे हालीमबीचे आवाहन फक्त मुस्लीम समाजातील स्त्री-पुरुषांसाठी नाही, ते समस्त माणूस जातीसाठी आहे. स्त्रीचे आयुष्य अजूनही तिला किती चांगला नवरा मिळतो यावर सुखाचे आहे की दु:खाचे हे ठरते. ही परिभाषा सगळ्याच स्त्रियांसाठी आहे, ती कुठेही बदललेली नाही. आणि संस्कार, नियम, संस्कृतीच्या नावाखाली याची रुजवात केवळ पुरुषांच्याच नव्हे तर स्त्रियांच्याही मनात इतकी खोलवर आहे की आपल्याला स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे, ओळख आहे हेच त्या विसरून गेल्यात. हालीमबीवरही टोकाची परिस्थिती ओढवल्यानंतर ती त्याविरुद्ध बोलते. तोवर तीही सहन करते.

हालीमच्या भूमिकेतील प्रीतम कागणेचा चेहरा नवा आहे. त्यातही तिने वापरलेली देहबोली, कमीतकमी मेकअप यामुळे कुठल्याही गावची सुंदर पण साधी तरुणी म्हणून ती सहज प्रभाव टाकते. प्रियदर्शन आणि चिन्मय दोघांनीही आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. आपल्याच बायकोचे दुसऱ्याशी लग्न लावून द्यायचे या विचाराने कासावीस झालेला कुद्दुस प्रियदर्शनने कमालीचा रंगवला आहे. तर एकीकडे हालीमची अडचण समजून घेणारा आणि तरीही मौलाना म्हणून धर्माच्या बंधनात अडकून कात्रीत सापडलेला मौलानाही चिन्मयने सुंदर रंगवला आहे. विजय चव्हाण यांच्या तोंडी कधी सरळ मराठी येते तर कधी ग्रामीण बोली. पण चित्रपट प्रामुख्याने प्रीतम, प्रियदर्शन आणि चिन्मय या तीन कलाकारांभोवती फिरतो. तरीही बाकीच्या छोटय़ा-मोठय़ा भूमिकेतही कलाकारांनी रंग भरले असल्याने वास्तव घटनेवरचा ‘हलाल’ अख्ख्या गावाच्या नजरेतून फिरवून आणतो. आपल्याच विचारातील विसंगती लक्षात आणून देत डोळ्यात झणझणीत अंजन टाकतो. दोन जीवांमधले भांडण संपवून त्यांना सहजपणे एकत्र यायची इच्छा असेल तर जिथे कायदाही अडथळा ठरत नाही, तिथे धर्माच्या नावाखाली भयानक परिस्थितीत दोघांनाही अडकवणारा नियम अनेक प्रश्न निर्माण करतो. धर्म म्हणजे समाजासाठी आखून दिलेले नियम. म्हटले तर ते त्या व्यक्तीच्या, समाजाच्या भल्यासाठी आहेत किंवा अध:पतनासाठी. शारीरिक आणि मानसिक रीत्याही एखाद्या व्यक्तीचे चुकीच्या नियमामुळे शोषणच होणार असेल तर फक्त धर्म म्हणून त्याचे अंधानुकरण करायचे का? असे अनेक प्रश्न ‘हलाल’ पाहताना मनात दाटतात. ‘हलाल’ची कथा केंद्रबिंदू ठेवूनही दिग्दर्शकाने त्या अनुषंगाने घडणाऱ्या आजूबाजूच्या घटनांमधूनही एकूणच सगळ्या समाजाच्या विचारसरणीवरही अचूक बोट ठेवले आहे. आजच्या काळातही ‘हलाल’चा संदर्भ खूप महत्त्वाचा ठरतो.

नवऱ्याने तीनदा तलाक म्हणून माहेरी आणून सोडलेली हालीम (प्रीतम कागणे) तिच्या दोन बहिणी आणि आईवडिलांबरोबर दोन वर्षे एकटीने जगते आहे. दोन वर्षांनी तिचा नवरा कुद्दुस (प्रियदर्शन जाधव) तिला परत पत्नी म्हणून घरी घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी येऊन धडकतो. हालीमला तलाक देण्याचे त्याचे कारण त्याच्याजवळ होते आणि ते तिच्या सुखासाठीच होते. खुद्द हालीमलाही आपल्या नवऱ्याबरोबर नांदायची इच्छा आहे. मात्र आपल्याकडे एकदा तलाक दिल्यानंतर बाईला नवऱ्याक डे जाता येत नाही हा धर्माचा नियम हालीमचे बाबा (विजय चव्हाण) तिच्यासमोर उभा करतात. यातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा गावातील मौलानाचा (चिन्मय मांडलेकर) सल्ला घेतला जातो. मौलानाने दिलेला सल्ला मानून हालीम आणि कुद्दुसला एकत्र आणण्यासाठी सगळा गाव जातिधर्म विसरून एकत्र येतो. पण, या भलत्याच नियमाचे पालन करताना कुद्दुसची त्याहीपेक्षा हालीमच्या मनाची स्थिती काय होते, याचा कधीच विचार केला जात नाही. एका नवऱ्याकडून तलाक, दुसऱ्याशी निकाह आणि त्याच्याकडून पुन्हा तलाक घेऊन मग पहिल्याबरोबर नांदण्याची हालीमची अग्निपरीक्षा यशस्वी होते का? धर्म म्हणजे नीतीचे वागणे हे अपेक्षित असताना हालीमवर हा धर्म लादताना तिच्या नैतिकतेचे वाभाडे निघतील याची जाणीव कोणाला होतच नाही का? हा प्रश्न जसा दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच या नैतिकतेची चाड बाळगा.. हे सांगण्याची हिम्मतही नायिकेतच निर्माण करत अंधानुकरणापेक्षा वैचारिकतेची कास महत्त्वाची आहे हेही दिग्दर्शकाने सहज लक्षात आणून दिले आहे.

‘हलाल’ची कथा राजन खान यांची आहे. मुळात, कथेतच लेखकाने थेट प्रसंग समोर उभा करत त्यातील नेमकी विसंगती दाखवून दिली आहे. त्यामुळे चित्रपटरूपात आणतानाही दिग्दर्शकाने आपले कौशल्य वापरून ते तितक्याच थेट प्रवाही चित्रण केले असल्याने कुठेही ते नाटकी वाटत नाही. या एकाच नियमाचे दोन धर्माच्या माणसांमध्ये, तेही पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही किती वेगवेगळे पडसाद उमटतात हेही कथेच्या ओघात जाणवून दिले आहे.

हलालाचा हवाला देऊन पुरुषाला शिक्षा म्हणून सांगितले गेलेले कृत्य प्रत्यक्षात स्त्रीला मानसिक, शारीरिक दोन्ही पद्धतीने उद्ध्वस्त करते. अशावेळी समोर असलेला कुठलाच पुरुष तिचे वडील, नवरा कोणीही तिला समजून घेऊ शकत नाहीत. किंवा समजत असूनही चालिरीतीप्रमाणे प्राधान्य देतात. माझ्याकडे धर्म म्हणून नव्हे तर माणुसकी म्हणून तरी बघा.. हे हालीमबीचे आवाहन फक्त मुस्लीम समाजातील स्त्री-पुरुषांसाठी नाही, ते समस्त माणूस जातीसाठी आहे. स्त्रीचे आयुष्य अजूनही तिला किती चांगला नवरा मिळतो यावर सुखाचे आहे की दु:खाचे हे ठरते. ही परिभाषा सगळ्याच स्त्रियांसाठी आहे, ती कुठेही बदललेली नाही. आणि संस्कार, नियम, संस्कृतीच्या नावाखाली याची रुजवात केवळ पुरुषांच्याच नव्हे तर स्त्रियांच्याही मनात इतकी खोलवर आहे की आपल्याला स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे, ओळख आहे हेच त्या विसरून गेल्यात. हालीमबीवरही टोकाची परिस्थिती ओढवल्यानंतर ती त्याविरुद्ध बोलते. तोवर तीही सहन करते.

हालीमच्या भूमिकेतील प्रीतम कागणेचा चेहरा नवा आहे. त्यातही तिने वापरलेली देहबोली, कमीतकमी मेकअप यामुळे कुठल्याही गावची सुंदर पण साधी तरुणी म्हणून ती सहज प्रभाव टाकते. प्रियदर्शन आणि चिन्मय दोघांनीही आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. आपल्याच बायकोचे दुसऱ्याशी लग्न लावून द्यायचे या विचाराने कासावीस झालेला कुद्दुस प्रियदर्शनने कमालीचा रंगवला आहे. तर एकीकडे हालीमची अडचण समजून घेणारा आणि तरीही मौलाना म्हणून धर्माच्या बंधनात अडकून कात्रीत सापडलेला मौलानाही चिन्मयने सुंदर रंगवला आहे. विजय चव्हाण यांच्या तोंडी कधी सरळ मराठी येते तर कधी ग्रामीण बोली. पण चित्रपट प्रामुख्याने प्रीतम, प्रियदर्शन आणि चिन्मय या तीन कलाकारांभोवती फिरतो. तरीही बाकीच्या छोटय़ा-मोठय़ा भूमिकेतही कलाकारांनी रंग भरले असल्याने वास्तव घटनेवरचा ‘हलाल’ अख्ख्या गावाच्या नजरेतून फिरवून आणतो. आपल्याच विचारातील विसंगती लक्षात आणून देत डोळ्यात झणझणीत अंजन टाकतो.

  • चित्रपट : हलाल
  • दिग्दर्शक – शिवाजी लोटन पाटील
  • कलाकार – प्रीतम कागणे, प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, विजय चव्हाण, विमल म्हात्रे, छाया कदम.

First Published on October 7, 2017 6:05 am

Web Title: halal marathi movie review
  1. No Comments.