साहित्य:
* ३०० ग्राम नूडल्स
* दीड कप तेल नूडल्स तळण्यासाठी
* दीड चमचा लसूण, बारीक चिरून
* एक चमचा आले, बारीक चिरून
* १ मध्यम भोपळी मिरची, चौकोनी तुकडे
* १ मध्यम कांदा, मध्यम चौकोनी तुकडे
* ४ मशरूम्स, उभे चिरून
* १ मध्यम गाजर, पातळ गोल चकत्या
* ४ चकत्या अननस, तुकडे करून
* १०० ग्राम पनीर, मोठे तुकडे
* २ पाती कांद्याच्या काडय़ा, बारीक चिरून
* ३ चमचे शेजवान सॉस
* ४-५ चमचे टोमॅटो केचप
* १ चमचा सोया सॉस
* १/४ चमचा मिरपूड
* २ चमचे साखर
* १ चमचा कॉर्न फ्लोअर
* २ वाटय़ा पाणी
* चवीपुरते मीठ

कृती:
Ò १) नूडल्स पाण्यात शिजवून घ्याव्यात. पाणी निथळून टाकावे. नूडल्स गरम तेलात कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्याव्यात.
२) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात आले लसूण परतावे. नंतर सर्व भाज्या घालून मोठय़ा आचेवर १-२ मिनिटे परतावे.
३) भाज्या परतल्या की अननसाचे तुकडे, शेजवान सॉस आणि टोमॅटो केचप घालून मिक्स करावे. १ वाटी पाण्यात कॉर्न स्टार्च मिक्स करून कढईत घालावे.
४) लागेल तेवढे पाणी घालून ग्रेव्हीला थोडासा दाटपणा येऊ  द्यावा. पनीर, मिरपूड, चवीला थोडेसे मीठ आणि साखर घाला.
तळलेल्या नूडल्स सवर्ि्हग प्लेटमध्ये ठेवा. त्यावर गरम ग्रेव्ही घाला. लगेच सव्‍‌र्ह करा.

चाऊ मेन
साहित्य:
* तीनशे ग्राम नूडल्स
* २ चमचे लसूण, बारीक चिरून
* १ चमचा आले, बारीक चिरून
* १ लहान भोपळी मिरची,
उभी पातळ चिरून
* ७ ते ८ फरसबी, पातळ तिरके चिरून
* १ लहान कांदा,
उभा पातळ चिरून
* २ पातीकांद्याच्या काडय़ा (कांद्याचा भाग गोल पातळ चकत्या कराव्यात. पाती तिरकी पातळ चिरावी.)
* २ चमचे सोया सॉस
* २ चिमटी मिरपूड
* चवीपुरते मीठ
* १ टेस्पून तेल

कृती:
१) नूडल्स शिजवाव्यात. नूडल्स शिजल्या की चाळणीत निथळून घ्याव्यात. त्यावर गार पाणी घालावे आणि १/२ चमचा तेल लावून ठेवावे म्हणजे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत.
२) कढईत अडीच चमचे तेल गरम करावे. त्यात लसूण आणि आले काही सेकंद परतावेत. नंतर फरसबी, कांदा आणि पातीकांद्याचा पांढरा भाग घालून अर्धा मिनिट परतावे. नंतर भोपळी मिरची घालून अर्धा मिनिट परतावे.
३) मीठ आणि सोयासॉस घालावा. ५-७ सेकंदांनी शिजवलेल्या नूडल्स घालाव्यात. सोयासॉस नूडल्सला सर्वत्र लागेल असे नीट मिक्स करावे. मिरपूड घालून टॉस करावे.
पातीकांदा थोडा आत घालावा आणि थोडा सजावटीसाठी ठेवावा. गरम नूडल्स चिली सॉस किंवा शेजवान सॉसबरोबर सव्‍‌र्ह कराव्यात.
टीप:
१) लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा पार्टीसाठी बदल म्हणून या नूडल्स छान लागतात. मिरपूड अगदी कमी घालावी.

व्हेजिटेबल क्रिस्पी
साहित्य:
भाज्या
* १ मध्यम भोपळी मिरची, मोठे उभे तुकडे
* १ मध्यम गाजर,
पातळ चकत्या
* १०० ग्राम पनीर, मोठे तुकडे
* १ लहान कांदा,
मोठे तुकडे आणि पाकळ्या वेगवेगळया कराव्यात
* २ पातीकांद्याच्या काडय़ा
* बॅटर
* ४ चमचे मैदा
* ६ चमचे कॉर्न फ्लोअर
* १ चमचा लसूण पेस्ट
* १/२ चमचा मीठ
* २ चिमटी खायचा लाल रंग (किंवा गरजेनुसार)
* २ चिमटी मिरपूड
इतर साहित्य
* तळण्यासाठी तेल
* १ चमचा तेल सॉस बनवण्यासाठी
* २ चमचे लसूण पेस्ट
* १ चमचा आले पेस्ट
* २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
* १ लहान कांदा, बारीक चिरून
* १ चमचा टोमॅटो केचप + १/२ चमचा सॉय सॉस + १ चमचा रेड चिली सॉस + १/४ वाटी पाणी
* १/२ चमचा व्हिनेगर (किंवा आवडीनुसार)
* १ चमचा कॉर्न फ्लोअर
* १/४ चमचा मिरपूड
* चवीपुरते मीठ

कृती:
१) ‘बॅटर’ या लेबलखाली दिलेले सर्व साहित्य एका वाडग्यात घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. या बॅटरमध्ये भोपळी मिरची, गाजर, कांदा, आणि बेबीकॉर्न यांचे तुकडे घालून मिक्स करावे. सर्व भाज्या बॅटरमध्ये व्यवस्थित घोळवाव्यात.
२) भाज्या गरम तेलात कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्याव्यात. तळलेल्या भाज्या पेपर टॉवेलवर काढून ठेवाव्यात. उरलेल्या बॅटरमध्ये पनीरचे तुकडे घोळवून तेही तेलात तळून घ्यावेत.
३)  कढईत १ चमचा तेल गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि मीठ घालावे. कांदा नीट परतावा.
४)  कढईत टोमॅटो केचप, रेड चिली सॉस आणि १/४ वाटी पाणी घालावे. नीट ढवळावे. लागल्यास थोडे मीठ घालावे.
५) लहान वाटीत २ चमचे पाणी आणि १ चमचा कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे. कढईत घालून थोडे घट्टसर होऊ द्यावे. मिनिटभर ढवळावे. त्यात व्हिनेगर घालावे.
६) आता यात तळलेल्या भाज्या आणि पनीर घालून १५-२० सेकंदच मिक्स करावे. वरून थोडी मिरपूड घालावी.
सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून वरून चिरलेली कांद्याची पात घालून सव्‍‌र्ह करावे.