News Flash

उन्हाळ्यातील पेय

उष्णता कमी होते आणि मिळणारी ऊर्जा त्वरित शोषली जाते.

उसाचा रस
उन्हाळ्यातील सगळ्यांचे आवडते आणि सर्वात जास्त घेतले जाणारे पेय म्हणजे उसाचा रस. उसाच्या रसात चांगल्या प्रमाणात ऊर्जा आणि भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे मिळतात. उष्णता कमी होते आणि मिळणारी ऊर्जा त्वरित शोषली जाते.
उसाच्या रसामध्ये कबरेदके, लोह, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.
उसाच्या रसामुळे त्वचेच्या तक्रारी दूर होतात. उन्हामुळे आलेला काळवंडलेपणा, सुरकुत्या, त्वचेवर येणाऱ्या तारुण्यपीटिका इत्यादी तक्रारी कमी होतात. त्वचेला तजेला येतो. त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते. रसामुळे लवकर ऊर्जा मिळते, थकवा लवकर दूर होतो. कॅल्शियम, फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत राहतात. तसेच दातपण निरोगी राहतात. विविध प्रकारच्या काविळींमध्ये अत्यंत उपयोगी. अरुची, मळमळ, थकवा, अशक्तपणा लवकर दूर होण्यास मदत होते. मलप्रवृत्ती आणि मूत्रप्रवृत्ती साफ होते, त्यामुळे मलबद्धता लघवीच्या तक्रारी कमी होतात. विविध प्रकारच्या कर्करोगांमध्येपण अतिशय उपयुक्त आहे.
उसाचा रस नेहमी ताजा प्यावा, त्यात लिंबू मिसळलेले असल्यास उत्तम, मात्र बर्फ टाकलेला उसाचा रस टाळलेलाच बरा. तसेच गुऱ्हाळाची स्वच्छताही महत्त्वाची बाब आहे.

नीरा
उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात घेतले जाणारे आणखी एक पेय म्हणजे नीरा. विविध जीवनसत्त्वे, कबरेदके, प्रथिने यात असल्याने उपयुक्त आहे. नीरा ताजी असतानाच घ्यावी. वातावरणातील उष्णतेने आंबण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते आणि त्याचे रूपांतर चार टक्के अल्कोहोल असलेल्या पेयामध्ये होऊ शकते. अरुची, भूक न लागणे यामध्ये चांगला उपयोग होतो. यात लोह, व्हिटॅमिन बी, ए आणि सी असल्याने रक्तवर्धक आहे. यकृताचे कार्य सुधारते. उन्हाळ्यातील उष्णतेच्या तक्रारी कमी होऊन शरीरास थंडावा मिळतो. पचनाच्या तक्रारी दूर होतात. मधुमेही व्यक्तींनाही उपयुक्त आहे. पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादींमुळे हृदयासाठीही उपयुक्त आहे.

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 1:12 am

Web Title: cool drinks in summer
टॅग : Chaturang,Summer
Next Stories
1 तुळशी बी वा सब्जा
2 उन्हाळ्यातल्या भाज्या
3 उन्हाळ्यातला आहार
Just Now!
X