20 February 2019

News Flash

आहारात करायचे बदल

दही घेण्याऐवजी ताक घ्यावे व ते मिरपूड टाकून घ्यावे तसेच ते ताजे असावे

रोजच्या आहारातील पदार्थामध्ये वातावरणानुसार बनवण्याच्या पद्धतींमध्ये बदल केला पाहिजे. गैरसमजुतींमुळे बरेचसे पदार्थ हिवाळ्यात टाळले जातात. तसे न करता काही बदल करून ते आहारात वापरले तर योग्य ठरेल. त्यातील काही पदार्थ खालीलप्रमाणे –
* दूध घेताना सुंठ, हळद टाकून उकळवून घ्यावे म्हणजे त्यामुळे कफ होणार नाही.
* दही घेण्याऐवजी ताक घ्यावे व ते मिरपूड टाकून घ्यावे तसेच ते ताजे असावे.
* सर्व जेवण शक्यतो गरम असतानाच खावे, परत परत अन्नपदार्थ गरम करू नयेत.
* भाज्यांचे सूप गरम असताना जिरेपूड, मिरपूड, दालचिनी टाकून घ्यावे. (प्रमाणात)
* आवळ्याचे विविध पदार्थ आहारात असावेत. उदाहरणार्थ च्यवनप्राश, आवळा, सरबत, आवळा कॅण्डी, मोरावळा इत्यादी. आवळा ‘क’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. नियमित सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते.
* तीळ, शेंगदाणे, जवस इत्यादी पदार्थाच्या चटण्या आहारामध्ये वापराव्यात. त्याद्वारे हिवाळ्यात आवश्यक असणारी स्निग्धता व उष्णता आपल्या शरीराला मिळते.
* चहा बनवताना आले, तुळस, गवती चहा, वेलची इत्यादी पदार्थ टाकून बनवावा.
* पिण्याचे पाणी कोमट असावे.
* आहारात गाईचे तूप (शक्यतो घरी बनवलेले), ताजे लोणी घ्यावे.
* हिवाळ्यात स्वयंपाकामध्ये मोहरीचे तेल, तीळतेल वापरू शकतो.
* बदाम, आक्रोड, पिस्ता, काजू इत्यादी सुकामेवा रोज प्रमाणात खाण्यास हरकत नाही.
* लसूण, आले, रोजच्या भाजीमध्ये वापरावे.
* बाजरी, नाचणी रोजच्या आहारामध्ये जरूर वापरावी.
* कच्चे सॅलड, जिरेपूड, लिंबू, मिरपूड टाकून रोज खावे.

डॉ. सारिका सातव
आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com

First Published on February 20, 2016 12:58 am

Web Title: food diet as per season
टॅग Health