22 November 2019

News Flash

उन्हाळ्यातल्या भाज्या

उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात तसेच त्या कशा कराव्यात याविषयी.

उन्हाळ्यात जेवण कमीच जातं. पाणी पिण्याकडेच जास्त कल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात तसेच त्या कशा कराव्यात याविषयी.
दुधीभोपळा – सर्व ऋतूंतील आणि सर्व वयांतील लोकांना चालणारी ही भाजी. खूप पथ्यकारक आहे. पचायला सोपी आणि कोणत्याही व्याधीत खाऊ शकतो. हृदयविकारात अतिशय उपयोगी.
गवार – उन्हाळ्यात गवार खाल्ल्यानंतर काही जणांना पित्ताचा त्रास होतो.
कारले – कारले कडू, पण पथ्यकारक.
कोबी, प्लॉवर – उन्हाळ्यातच नव्हे तर अन्य ऋतूंतही बऱ्याच जणांना खाल्ल्यानंतर वाताचा
त्रास होतो.
भेंडी – मूतखडय़ाच्या रुग्णांनी कमी प्रमाणात खावी.
भाज्या बनवताना घ्यावयाची काळजी
भाज्यांना तेल कमी प्रमाणात वापरावे, त्याचप्रमाणे मसाल्यांचा वापरही कमी असावा.
भाजी ताजी असावी (बनवताना), तसेच भाजी बनवल्यानंतर ताजी असतानाच खावी.
उन्हाळ्यात गरम मसाल्यांचा वापर कमीतकमी करावा.
भाज्यांमध्ये आमसूल वापरावे, खूप जास्त पाण्यात भाज्या शिजवू नयेत.
भाज्या डाळ घालून शिजवाव्यात. भाज्यांचे सूप बनवावे.
भाज्या खाताना लिंबू जरूर वापरावे, जिरेपूड, धणेपूडचा वापर भाज्यांमध्ये करावा.
भाज्या खूप दिवस फ्रिजमध्ये ठेवू नये.
मिठाचा वापर आवश्यकतेनुसार करावा, जास्त प्रमाणात मीठ वापरू नये.

डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com

First Published on May 7, 2016 1:20 am

Web Title: health food vegetables in summer
Just Now!
X