04 August 2020

News Flash

उष्णता करू कमी

उन्हाळ्यामध्ये आहारातील द्रवपदार्थ किती महत्त्वाचे असतात ते आपण जाणतोच

उन्हाळ्यामध्ये आहारातील द्रवपदार्थ किती महत्त्वाचे असतात ते आपण जाणतोच, पण तेच द्रवपदार्थ ऋ तुनुसार काही बदल करून घेतल्यास जास्त फायदा देतात. कारण कोणताही पदार्थ आपण आहारात कशा पद्धतीने घेतो यावर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात किंवा त्याचे फायदे अवलंबून असतात. वातावरणातील उष्णतेचा शरीरावर परिणाम होऊन जास्त त्रास होऊ नये व शरीरातील द्रवांश कमी होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. उन्हाळ्यात पुढील द्रवपदार्थ घेतल्यास नक्कीच फायदा होईल.

दूध तसेच न घेता गुलकंद घालून घेतल्यास उत्तम, तुळशीचे बी/ सब्जा दुधातून/ पाण्याबरोबर घ्यावे. पिण्याच्या पाण्यामध्ये वाळा टाकून प्यावा, पाण्यामध्ये साळीच्या लाह्य़ा टाकून घेतल्यासही खूप फायदा होतो. लघवीला जळजळ होत असणाऱ्यांनी धने भिजत घालून ते पाणी घ्यावे. डाळीचे पाणी/ भाज्यांचे सूप यांमध्ये कोकम घालून घ्यावे, आमसुलाचे सार दोन्ही जेवणात घेतल्यास हरकत नाही, आमसूल फक्त पाण्यात भिजत घालून ते पाणी घेतल्यासही खूप फायदा होतो, मठ्ठा बनवून कोथिंबीर घालून घ्यावा, साध्या साखरेऐवजी पेयांमध्ये खडीसाखरेचा वापर करावा, सोलकढी जेवणाबरोबर घेऊ शकतो, फ्रीजमधील पाण्याऐवजी माठातील पाणी वापरावे, दुधी भोपळ्याचा, कोहळ्याचा ताजा रस, सरबत खूप फायदा देतो, नाचणीची उकड ताक घालून घ्यावी, जास्त प्रमाणात शारीरिक व्यायाम असणाऱ्यांनी किंवा उन्हात खूप काम असणाऱ्यांनी तसेच खेळाडूंनी साध्या पाण्याऐवजी विविध प्रकारची सरबते/ नारळपाणी घेण्यावर भर द्यावा, हे सर्व बदल केल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत करते.

– डॉ. सारिका सातव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 1:03 am

Web Title: lets beat the heat
टॅग Chaturang,Loksatta
Next Stories
1 सुरुवात उन्हाळ्याची
2 सुका मेवा हिवाळ्यातील आवश्यक आहार
3 आहारात करायचे बदल
Just Now!
X