महाराष्ट्रातील एक बंडखोर शायर याकूब राही. राहींच्या काव्यात त्यांचा स्वत:चा रंग आहे. राहींचा प्रेम, विरहस्वर गझलांतून अलवार तरळत रेंगाळतो तसाच त्यांचा विद्रोही स्वर नज्म व ग़ज़्‍ालेतून आवेगाने उचंबळून येतो, म्हणूनच ते म्हणतात,
तमाम नशा-ए-कातिल उतर के रह जाए, तुम उसके हाथ से तलवार छीन कर देखो

जब कत्ल करने निकले हो तुम मेरी रुह को
फिर मैं तुम्हारे हाथ की तलवार क्यों बनू?
महाराष्ट्रातील दुसऱ्या बंडखोर शायराचा हा शेर आहे. उर्दूत बंडखोर शायरात प्रथम नाव येते ते मिर्जा यास यगाना चंगेजी यांचं, त्यानंतर आवर्जून घ्यावं असं नाव म्हणजे मुंबईचे बाकर मेहदी मरहूम यांचं. याच बाकर मेहदी स्कूलचे शीर्षस्थ शायर आहेत याकूब राही. त्यांचा उपरोक्त शेर त्यांच्या काव्य-प्रकृतीचा द्योतक म्हणता येईल.
बाकरसाहेब उर्दूचे जदीद शायर, समीक्षक, संपादक व जागतिक वाङ्मयाचे गाढे जाणकार होते. मुंबईत येऊन बाकर मेहदींना न भेटता परतणे हा भारत-पाकमधील साहित्यिकांत अपराध मानला जाई. अशा ख्यातनाम व्यक्तिमत्त्वाच्या वैचारिक संप्रदायात याकूब राहींच्या शायरीची परवरिश झाली, पण राहींच्या काव्यात त्यांचा स्वत:चा रंग आहे. बाकर यांचे अनुकरण वा अनुसरण नाही. त्यांची ही एक चíचत कविता,
शेवटची काडी आहे
काडेपेटीत जपून ठेवा
न जाणो
सुकलेलं पीक जाळण्यासाठी
केव्हा तरी कामी येईल.

तुम्ही या साऱ्याला
स्थायी पराभव का मानता?
शांत
पण निरंतर तीव्र गतीने
वाहणाऱ्या लाटांनी
चेतनाशून्य खडकांशी
कधी हार मान्य केली?
कधी समझोता केला?
राहींचा विद्रोही स्वर नज्म व ग़ज़्‍ालेतून जेवढा आवेगाने उचंबळून येतो तेवढाच पत्नी प्रेमाच्या आठवणीत भिजल्यावर अलवार तरळत रेंगाळतो. वियोगाचा रंग पाहा-
ये चिडिम्यों की चेहकार
फूलों की खुश्बू, ये दीवारो-दर
ये बेटे, बहू, घर की *आराइशें, सारी
* ज़ोबाइशें,
अपनी-अपनी जगह पर हैं लेकिन
तुम्हारे न होने से लगता है जैसे अकेला हूँ मैं
चली आओ तुम – आ भी जाओ
कि बचन आँखें तुम्हें ढूँढती हैं
तुम्हीं से ये घर है।

पहले मैं * बेहिस था शायद
लेकिन जब से तुम बिछडम्े हो,
गिरने वाले सूखे पत्ते
लम्हा लम्हा चौंकाते हैं
गुज़ारे मौसम याद आते हैं।

* गुज़िश्ता
चंद बर्सो से
तुम्हारी नित नई बीमारियाँ
फिक्रें बढमती हैं
न मेरी रात सोती है,
न मेरा दिन चहकता है
यही अंदेशा रहता है
कि जाने कब मुझे अंधे सफ़र में
छोडम्कर तन्हा गुज़ार जाओ
अगर ऐसा ही करना है .. तो ठहरो
मुझे भी साथ ले जाओ
कि मेरी ज़िंदगी – मेरी बची साँसें
कही मेरे लिए
अंधा कुआँ बन कर न रह जाएँ।
याकूब राहींची पत्नी बेगम शमीम राही ही त्यांची प्रेयसीच होती. तिच्या अकाली निधनाने राही बरेचसे उदास, मौन अन् भावुक झाले व तोच भाव त्यांच्या वर्तमान काळातील कविता, ग़ज़्‍ालात वरचढ वाटतो. पण समाजातील अग्राह्य़, असत्य वृत्तींचा निषेध करताना राहींची लेखणी धारदार होतेच. निर्वकिारपणे अन्याय, शोषण सोसणाऱ्या समाजाबद्दल राही म्हणतात-
सब यहाँ बठे हैं ठिठुरे हुए, घबराए हुए
धूप की खोज में अब कोई निकलता ही नहीं
सिर्फ एक मैं हूँ जो हर रोज नया लगता हूँ
वर्ना इस शहर में तो कोई बदलता ही नहीं
पण कर्तव्यशून्य न होता ते बजावतात-
रेत ख़्वाबों की हो कि दर्द के फूल
अपनी झोली में कुछ भरो बाबा
* खौफ की धुंध घेर लेगी तुम्हें
क्या ज़रूरी है तुम डरो बाबा?
जंग जब उनसे * लाज़मी ठहरें
उनसे फिर जंग ही करो बाबा
जितना चाहेगा, दाम पाएगा
फिर भी नीलाम अपनी जात न कर
कारण- * सरकशी * जब्रो-जुल्म का है जवाब
जहर को सिर्फ जहर मारे है
बंड हेच जुलूम व अन्यायाला उत्तर आहे, विषाला उतारा विषाचाच हवा ही राहींची धारणा आहे. या जुलूम, अन्यायाच्या वर्तुळात प्रवास कुठवर करायचा? हा परीघ तोडा आता. ही चतन्यशून्यता अन ती पूर्वीची बंडखोरी कुठे?
मुजरिम कहें न खुद को तो और क्या कहें?
अन्याय करणारे गोड बोलण्याने का सरळ होतात?
* खुश-कलामी से कब लोग सीधे हुए
* तल्ख़गोई करो, बदज़्ाबानी करो
कटू वचन बोला, फटकळपणे वागा, तेव्हाच ते समजतील. सहिष्णू वृत्ती एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण अन्यायाचा
अतिरेक होत असेल तर राहींचा सल्ला अनुचित नाही. अन् पुढे याकूब राही म्हणतात-
तमाम * नशा -ए -कातिल उतर के रह जाए
तुम उसके हाथ से तलवार छीन कर देखो
याकूब राहींचा जन्म १० जून १९४३ ला माणगाव येथे झाला. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजातून ते १९६६ मध्ये बी.ए. झाले. बी.एड्. एम.ए. करून ते मुहम्मदिया हायस्कूल मुंबई येथे शिक्षक झाले. महाराष्ट्र स्टेट बुक ब्यूरो, भाषा संचालनालयात खास उर्दू अधिकारी म्हणून काही वष्रे नोकरी केली. आणीबाणी जाहीर होताच राहींवर उर्दू वृत्तपत्रांच्या सेन्सॉरशिपची जबाबदारी टाकण्यात आली. ते काम त्यांच्या प्रकृतीच्या विरुद्ध होते. त्यांनी राजीनामा देऊन एका स्थानिक संस्थेच्या मदतीने मरोळ येथे उर्दू हायस्कूल स्थापन केली. त्या शाळेला याकूब राहींनी उत्तम उर्दू शाळेचा दर्जा प्राप्त करून दिला. मुख्याध्यापक व शिक्षक या नात्याने अनेक हुशार विद्यार्थी त्यांनी
घडविले. राही मोजकेच व संक्षिप्त सृजन करणारे कवी आहेत. ते म्हणतात-
यहाँ है तूल कलामी-ए-नसर का सिक्का
यहाँ मेरे सुखन-ए-मुख्तसर की किमत क्या है?
(इथे पाल्हाळिक गद्य लिखाणाचाच बोलबाला आहे, मग माझ्या संक्षिप्त लिखाणाचं इथे मोल काय असणार?
ते म्हणतात, ‘‘मं बुनियादी तौर पर एक कमिटेड शायर हूँ और मेरा कमिटमेंट जीवन के कांतिकारी मूल्यों से है। इस बात की संभावना हैं कि कुछ लोग मेरी शायरी को * तरक्की-पसंद शायरी का विस्तार करार दें लेकिन मैं उसूलन नाम-निहाद तरक्की पसंदों से मुखतलिफ (भिन्न) हूँ। तरक्की-पसंद * कलमकार अगरचे आज़ादी के संघर्ष में एक विश्वस्त नाम बनकर अपने * कारनामों के ऐवज * वजीफे बटोर ने में व्यस्त हैं।’’
आता जरा याकूब राहींच्या संवेदनशील कल्पनांचे तरल सृजन अनुभवू या.
पिघलते फर्श पे जब दिन की धूल सोती है
छलकने लगता है आँखों में हसरतों का लहू
रगों में दौडम्ती फिरती है तेरी याद की रौ
करीबों- दूर सुलगती हुई हर एक शय में
उभरने लगती है रह-रह के तेरे दर्द की लौ।

लाख कोशिश करो भुलाने की
ज़ख्म फिर भी हरा ही रहता है
हमसफर साथ छोडम् जाते हैं
दूर तक रास्ता ही रहता है

* खुश्क पौदे, खुश्क पत्ते, खुश्क फूल
बदलियाँ प्यासों को तरसाने लगी
* मुन्तजिर आँखों में जागी तितलियाँ
जिंदगी जीने पे उकसाने लगी

तेरे बिन कब संभल रही है रात?
तुझसे मिलने मचल रही है रात
तेरे कदमों की एक आहट सी
जैसे करवट बदल रही है रात
शोला-शोला, तेरे ख़याल की आग
धीरे – धीरे, पिघल रही है रात
राही म्हणतात, साहित्य, कला व सौंदर्याच्या निकषांवर पूर्णपणे उतरले पाहिजे. त्याच्याशिवाय ते साहित्यहीन बनतं. अन् होय, मी प्रकृतीनेच संक्षिप्तवादी कवी आहे. एवढं मात्र मी जाणतो की मी मला ते सांगायचं आहे ते मी काही शब्दात किंवा काही ओळीत अभिव्यक्त जर करू शकतोय, तर मग माझ्या लेखणीने पाल्हाळ का लावावा? माझ्या कविता लहान व अत्यंत लघू स्वरूपाच्या असतात. माझ्या ग़ज़लादेखील तीन, चार किंवा पाच शेरांत पूर्ण होतात. विषयाच्या मागणीविरुद्ध पाल्हाळिक कमाल दाखवणारे शायर विद्यमान आहेत की-
याकूब राहींचे पाच ग़ज़्ाल-काव्यसंग्रह आहेत. इन्हेराफ (१९७५), हर्फे मुकर्रर (१९७७) , लम्हा लम्हा जागी रात (१९८५), ख्वाब तहरीर (२०००) व देवनागरीत हर्फे- इन्कार (२००४). राहींनी बाकर मेहदींवर एक संस्मरणात्मक-समीक्षात्मक स्वरूपाचा ग्रंथ लिहून आत्मीय ऋण फेडलं आहे
याकूब राही कोकणातले असल्याने उर्दू एवढंच त्यांना मराठीवर प्रेम आहे अन् मराठीवर त्यांचं उत्तम प्रभुत्वदेखील आहे. त्यांनी मराठी-उर्दू संदर्भात केलेलं अत्यंत मोलाचं काम म्हणजे मराठीतील समग्र मान्यवर दलित कवींच्या पाच-पाच कवितांचा उर्दूत लक्षणीय अनुवाद हा बृहद्संग्रह उर्दू साहित्यात गाजला पण त्याची दखल साहित्य अकादमींनी मात्र घेतली नाही. या गोष्टीचे व्यक्तिश: मला दु:ख आहे. पण राहींना त्या गोष्टीचा विषादही वाटत नसावा.
उलट ते सकारात्मक वृत्तीने म्हणतात-
चलो तो
एक बार फिर
आज मुस्कुरा ही दो
कि झिलमलाती मुस्कुराहटों की ओट- ओट से
महेक उठें गुलाब रंग – रंग के
बुझी – बुझी सी आँख में सँवर सके
तुम्हारे हुस्नो – रूप की
खिली – खिली सी चाँदनी
चलो तो
मुस्कुरा ही दो।
(गुज़िश्ता : मागील, भूतकालीन, आराहशें : सजावट-आरास, तल्खगोई : कटुवचन, जेबाइशे : शोभा, शृंगार, सजावट, बेहिस : सुन्न, चतन्यहीन, अंदेख्ता : शंका, भीती, काळजी, धास्ती, खौफ : भय, वजीफे : वेतन, शिष्यवृत्ती, मजुरी, लाजमी : अनिवार्य, अपरिहार्य, आवश्यक, सरकशी : अवज्ञा, बंडखोरी, खुश्क : कोरडा, शुष्क, जब्रो- जुल्म : अत्याचार जुलूम, अन्याय, िहसा,
मुंतजिर : प्रतीक्षारत, खुश-कलामी : मधुर भाषण,
नशा-ए-कातिल : हत्या करणाऱ्याची नशा,
कलमकार : लेखक, कारनामे : कर्तबगारी,
तरक्की पसंद : पुरोगामी)
डॉ. राम पंडित -dr.rampandit@gmail.com