हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि संगीतासाठी पहिला ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमानबद्दल, म्हणजे त्याच्या गाण्यांबद्दल फारसं कुणाचं दुमत असण्याची शक्यता नाही. एक तर तो आवडतोच किंवा आवडत नाही. पण त्याची लोकप्रियता पाहता, तो आवडत नाही, असं म्हणणारा संगीतप्रेमी समोर येणं तसं कठीणच. तर ते असो.
रहमानवर तशी बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातून त्याचा आजवरचा प्रवास समजावून घेता येतो. गेल्याच आठवडय़ात चेन्नईमध्ये ‘रिफ्लेक्शन्स-म्यूझिक, मोमेंटस, मेमरीज, ए. आर. रहमान रिकलेक्टस’ हे नवे कॉफीटेबल बुक थाटामाटात प्रकाशित झाले आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध छायाचित्रकार टी. सेल्वा कुमार यांनी या देखण्या पुस्तकातील छायाचित्रे काढली आहेत. त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीतून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
रहमानपासून प्रेरणा घेतलेल्या, त्याच्यासोबत गायलेल्या गायक-गायिकांनी त्याच्याविषयीच्या आपल्या आठवणी आणि अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत. त्यांना मुबलक छायाचित्रांची कल्पक जोडही दिली आहे.
रहमानची जादू नेमकी काय आहे आणि त्याचं गारुड आजच्या तरुण पिढीवर कसं आहे, हे या पुस्तकातून दृग्गोचर होतं.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
द म्यूट अँक्लेट : राधिका नाथन, पाने : २९२२९५ रुपये.
द बिकिनी मर्डर्स : फारुख धोंडी, पाने : ३७६३९९ रुपये.
द इक्कोस क्लॅन : सुदिप्तो दास, पाने : २८२३५० रुपये.
वाइज इनफ टू बी फुलिश : गौरी जयराम, पाने : २१६८५० रुपये.
होल्ड माय हँड : दुजरेय दत्ता, पाने : २१६१४० रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
द रेस ऑफ माय लाइफ : मिल्खा सिंग, पाने : २४०२५० रुपये.
द न्यू बिहार-गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट : निकोलस स्टेर्न, एन. के. सिंग, पाने : ३६०७९९ रुपये.
हिच्ड- द मॉडर्न वूमन अँड अरेंज्ड मॅरेज : नंदिनी कृष्णन, पाने : २७२२९९ रुपये.
लेडी, यू आर नॉट अ मॅन-द अॅडव्हेंचर्स ऑफ अ वूमन अॅट वर्क : अपूर्वा पुरोहित, पाने : १९२१९५ रुपये.
रिफ्लेक्शन्स-म्यूझिक, मोमेंट्स, मेमरीज, ए.आर. रहमान रिकलेक्टस : टी. सेल्वा कुमार, पाने : २७२/१४९९ रुपये.