येणार येणार म्हणून दवंडी पिटवणारं अ‍ॅमेझॉन डॉट कॉम हे जगातलं सर्वात मोठं ऑनलाइन स्टोअर या आठवडय़ात भारतात दाखल झालं! गेल्या काही वर्षांत भारतात ऑनलाइन स्टोअरची संख्या वाढली आहे आणि त्यांना मिळणारा प्रतिसादही वाढला आहे. सुरुवातीला फ्लिपकार्ट डॉट कॉम या संकेतस्थळावरून पुस्तकांची विक्री सुरू झाली. पुस्तकांच्या माफक किमती, चांगला दर्जा, उत्तम पॅकिंग आणि ठरलेल्या वेळेत सेवा, या जोरावर फ्लिपकार्टने अल्पावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला. मग कपडे, पादत्राणे, इलेक्ट्रानिक वस्तू, मोबाइल फोन, स्टेशनरी, चित्रपट, सौंदर्यप्रसाधने या वस्तूही फ्लिपकार्टने द्यायला सुरुवात केली. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळू लागला.
घरपोच खात्रीशीर सेवा मिळत असेल तर ती कुणाला नको असते! फ्लिपकार्टचा बोलबोला इतका वाढला की, मध्यंतरी अ‍ॅमेझॉनने फ्लिपकार्ट विकत घेण्याची शक्यता बोलून दाखवली होती. पण अ‍ॅमेझॉनमध्येच काही काळ काम केलेल्या दोन मित्रांनी सुरू केलेली ही कंपनी ‘आपण कुठल्याही परिस्थितीत विकणार नाही’, याची ग्वाही दिली.
सध्या भारतात फ्लिपकार्ट, इन्फीबीम, स्नॅपडील, होमशॉप एटीन, अशी काही ऑनलाइन स्टोअर सुरू आहेत. त्यात आता अ‍ॅमेझॉन आल्याने थोडीशी खळबळ उडालीय.  अ‍ॅमेझॉनने आतापासूनच फ्लिपकार्टपेक्षा स्वस्त पुस्तकं द्यायला सुरुवात केली आहे. हिंदूी-इंग्रजीतील १२,००० पुस्तके, चित्रपट-टीव्ही शोज, असा मोठा साठा अ‍ॅमेझॉनकडे आहे. पण स्वत:ची वितरण यंत्रणा त्यांच्याकडे नाही. ते ही सुविधा बाहेरच्या कंपनीकडून देणार आहेत. लवकरच मोबाइल फोन, कॅमेरा यांचीही विक्री अ‍ॅमेझॉनवरून करण्यात येईल. सध्या १०० वितरक आणि मुंबईत मोठे केंद्रीय कार्यालय असा अ‍ॅमेझॉनचा पसारा असेल. आधी भारतीय कंपनीच विकत घेण्याच्या गमजा करणाऱ्या अ‍ॅमेझॉनला आपले पाय विश्वासार्ह उत्पादने आणि सेवा यांच्या जोरावरच भारतात रुजवावे लागतील. केवळ वाढत्या इंटरनेटधारकांची संख्या लक्षात घेणं पुरेसं नाही, हे लवकरच कळेल.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
इन्फेर्नो : डॅन ब्राऊन, पाने : ५२८७५० रुपये.
फॉलिंग इन लव्ह अगेन : रस्किन बाँड, पाने : २०८१९५ रुपये.
कन्फेशन्स ऑफ अ कॉल सेंटर : क्रिस योनझोन, पाने : १४४१०० रुपये.
माय ब्रदर्स वेडिंग : अंदालिब वाज़िद, पाने : २७२२९५ रुपये.
द रेड कार्पेट : लावण्या शंकरन, पाने : २२४१५० रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
द वे ऑफ द नाइफ : मार्क माझेट्टी, पाने : ३९२४९९ रुपये.
टू बी ऑर नॉट टू बी : दिपेन अंबालिया, पाने : २७७१९५ रुपये.
द नामो स्टोरी : किंगशुक नाग, पाने : २०८२९५ रुपये.
एफ यू कॅन ड्रीम : ए. जी. कृष्णमूर्ती, पाने : ३२०/३२५ रुपये.
अँड व्हॉट रिमेन्स इन द एण्ड : रॉबिन गुप्ता, पाने : ३०४३५० रुपये.

सौजन्य : फ्लिपकार्ट डॉट कॉम