12 August 2020

News Flash

बुकर जाणार कुणीकडे?

अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांतून पुरेपूर गवगवा होत असलेल्या ‘मॅन बुकर प्राइझ’ची या वर्षीची लाँगलिस्ट नुकतीच जाहीर झाली आहे.

| July 27, 2013 01:03 am

अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांतून पुरेपूर गवगवा होत असलेल्या ‘मॅन बुकर प्राइझ’ची या वर्षीची लाँगलिस्ट नुकतीच जाहीर झाली आहे. १५१ पुस्तकांमधून निवड समितीने १३ कादंबऱ्यांची  निवड केली आहे. यातील तेरा कादंबरीकारांपैकी सात महिला तर सहा पुरुष आहेत. त्यात झुम्पा लाहिरी या भारतीय वंशाच्या लेखिकेची ‘द लोलँड’, तर ताश अ‍ॅव या मलेशियन लेखकाच्या ‘फाइव्ह स्टार बिलिओनेर’चा समावेश आहे. अ‍ॅव यांच्या आधीच्या कादंबरीची २००५ साली लाँगलिस्टसाठी निवड झाली होती. बाकी कुणाचीही आजवर तशी निवड झालेली नाही की, त्यांना हा पुरस्कार मिळालेला नाही. झुम्पाला याआधी पुलित्झर पुरस्कार मिळाला असला तरी मॅन बुकर मिळालेले नाही आणि सध्याच्या स्पर्धकांमध्ये तीच जास्त सेलिब्रेटी असल्याने दरवर्षी या पुरस्कारासाठी जो सट्टा लागतो, त्यात झुम्पा सर्वात आघाडीवर असणार आहे. पण प्रत्यक्षात बुकरचे दान कुणाच्या पदरात पडणार यासाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत वाट पाहावी लागणार. तोवर जगातील सर्वाधिक रकमेपैकी एक, म्हणजे ५०, ००० पौंडाच्या या पुरस्कारासाठी त्याच्या कैकपट सट्टा नेहमीप्रमाणे खेळला जाईल आणि काहींची चांगली वरकमाईही होईल.
फ्रंट
शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
नो मॅन इज इन आयलंड : रस्किन बाँड, पाने : १९२१९५ रुपये.
नाइन-कर्स ऑफ द कलिंगण (बुक १) : शोभा निहलानी, पाने : ३८४२५० रुपये.
माइंड रीडर : लिओर सचर्ड, पाने : २०४२९९ रुपये.
रिव्हेंज वेअर्स प्रदा : लॉरेन वेईबर्जर, पाने : ३२०२९९ रुपये.
बूमटाऊन : आदित्य मुखर्जी, पाने : १२३२९५ रुपये.
टॉप  ५ नॉन-फिक्शन
टॉकिंग सिनेमा : भावना सोमय्या, पाने : ३०४२९९ रुपये.
फास्टर-१०० वेज टू इम्प्रूव्ह युवर डिजिटल लाइफ : अंकित फादिया, पाने : ३३६१९९ रुपये.
डायरेक्टर्स कट : एम. के. राघवेंद्र, पाने : ३२०३९९ रुपये.
पोप फ्रान्सिस : सर्जिओ रुबिन, फ्रान्सेस्का अ‍ॅम्ब्रोगेटी, पाने : ३०४/७९९ रुपये.
माय एन्काउंटर विथ आयआयटी जीईई : अर्पित अगरवाल, पाने : १५४/१५० रुपये.

सौजन्य :
फ्लिपकार्ट डॉट कॉम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2013 1:03 am

Web Title: booker goes to
Next Stories
1 गौप्यस्फोटानंतर..बेस्टसेलर
2 ‘अनसुटेबल’ विक्रम सेठ!
3 ‘इन्फनरे’ खपतेच आहे..
Just Now!
X