फिक्शन
१) आवरण : एस. एल. भैरप्पा, इंग्रजी अनुवाद-संदीप बालकृष्ण,
पाने : ४००३९५ रुपये.
‘आवरण’ ही एस. एल. भैरप्पा यांची २००७ साली प्रकाशित झालेली आणि कन्नडमध्ये वादग्रस्त ठरलेली कादंबरी. पुढील दोन वर्षांत या कादंबरीच्या २२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. तिचे समर्थन करणारी सहा तर तिच्यावर टीका करणारी चार पुस्तके प्रकाशित झाली.     यू. आर. अनंतमूर्ती, चंद्रशेखर कंबार, गिरीश कार्नाड या ज्ञानपीठ विजेत्या कन्नड साहित्यिकांनी या कादंबरीवर सडकून टीका केली तर कन्नड वाचकांनी तिचे मोठय़ा प्रमाणावर स्वागत केले.
२) द चाइल्डहुड ऑफ जेसुस :       जे. एम. कोएत्झी,
पाने : ३३६३९९ रुपये.
कोएत्झीची ही नवी कादंबरी. तुम्ही कोएत्झीचे चाहते असाल तर तुम्हाला ही कादंबरी आवडेलच, आणि समजा नसाल तर वेगळा असा अनुभव घ्यायचा असेल तर या कादंबरीच्या वाटेला जायला काहीच हरकत नाही.  
३) कोन्जो : द फायटिंग स्पिरीट- संदीप गोयल, पाने : २६०२९९ रुपये.
इच्छाशक्ती, गुणवत्ता आणि कठोर मेहनत या सद्गुणांचा पुतळा असलेल्या कादंबरीनायकाचा हा एका जपानी कंपनीबरोबरचा प्रवास. ‘कोन्जो’ म्हणजे लढण्याची इच्छाशक्ती. यातून कार्य -कुशलतेचं आणि कौशल्याचं दर्शन होतं

नॉन-फिक्शन

१) ट्रॅव्हल्स विथ चाची : लुईस फर्नाडिस खुर्शीद,
पाने : २५६३५० रुपये.
केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नीचं हे पुस्तक. दिल्लीत राजकीय नेते, पुढारी, लेखक-विचारवंत या सर्वासाठी अॅम्बॅसेडर टॅक्सी ही दैनंदिन प्रवासाची गरज आहे. त्याविषयीचं हे पुस्तक दिल्लीचं मानसशास्त्रही उलगडवतं.  
२) टेक मी होम – द इन्पायरिंग स्टोरीज ऑफ २० आन्त्रुप्रेनर्स फ्रॉम स्मॉल टाऊन इंडिया विथ बिग-टाईम ड्रीम्स : रश्मी बन्सल,   पाने : ३८४२०० रुपये.
उदारीकरणाच्या गेल्या दोन दशकांच्या काळात छोटय़ा शहरांत घडून आलेल्या बदलांची स्पंदनं टिपणारं हे पुस्तक आहे. भारतातल्या वेगवेगळ्या छोटय़ा शहरांत उद्योजक म्हणून पुढे आलेल्यांच्या या कहाण्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकतात.
३) रिटर्न ऑफ द रिव्हर्स – रेसिपीज अँड मेमरीज ऑफ द हिमालयन रिव्हर व्हॅलीज : विकास खन्ना,
पाने : ४४४/२२९५ रुपये.
दलाई लामा यांच्या ल्हासाला भेट देऊन त्यांच्याविषयी पुस्तक लिहिण्याची पाश्चात्य चढाओढ आता भारतीय लेखकांमध्येही अवतरू लागली आहे. हे पुस्तक त्यापैकीच एक. हिमालयाचं आकर्षण आणि दलाई लामा यांची भेट, ही दोन आकर्षणं हा मुख्य गाभा आहे.